Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस उरले असताना पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दिल्लीत यंदा तिरंगी लढत होत असून आप आणि भाजपा प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. तर काँग्रेसही स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहे. आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्यात प्रत्यक्ष मैदानात आणि सोशल मीडियावर जोरात प्रचार सुरू असताना आज ‘आप’ने सोशल मीडियावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर पहिल्यांदाच टिकास्र सोडले. ‘आप’ने एक्सवर एक डिजिटल पोस्टर शेअर केले असून त्यात बेईमान नेत्यांची यादी दिली आहे. यात राहुल गांधी यांचाही समावेश करण्यात आला आहे.

या पोस्टरवर माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा फोटो आहे. “केजरीवाल की ईमानदारी, सारे बेईमानों पर पडेगी भारी”, अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. तर खाली ‘आप’ने ठरविलेल्या अप्रामाणिक नेत्यांचे फोटो देण्यात आले आहेत. यामध्ये पहिलाच फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरा फोटो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि तिसरा फोटो लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा लावण्यात आला आहे. यावरून आता ‘आप’ने थेट राहुल गांधींवरही हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

राहुल गांधींनी उल्लेख केल्याने बावनकुळेंचा कामठी मतदारसंघ पुन्हा चर्चेत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Arvind Kejriwal election result
मोदी, मध्यमवर्गीयांच्या बळावर दिल्लीत भाजपचे डबल इंजिन! केजरीवाल, ‘आप’ पराभवातून कसे सावरणार?
revenue minister chandrashekhar bawankule on son law loan catering money Wardha
“जावयाचं कर्ज नको, हे घ्या जेवणाचे पैसे,” महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?
भाजपची चतुर खेळी,जि.प.चा रोखलेला निधी केला मंजूर
भाजपची चतुर खेळी,जि.प.चा रोखलेला निधी केला मंजूर
Bachchu Kadu demands an inquiry of Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana from Election Commission
‘लाडक्या बहिणी’च्या अडचणी वाढणार, बच्चू कडूंची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
pune mns Office bearers and activists became Active during elections time
पुण्यात ‘मनसे’ला मराठी माणसाची पुन्हा आठवण

राहुल गांधी यांनी नुकतीच ‘आप’ सरकारच्या कारकिर्दीवर टीका केली होती. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्या काळात दिल्लीत जो विकास झाला, तसा विकास अरविंद केजरीवाल यांच्या काळात झाला नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते. गुरुवारी जाहीर सभेत बोलत असताना राहुल गांधी म्हणाले, “माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या खऱ्या विकासाच्या मॉडेलची दिल्लीला आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या खोट्या प्रचार तंत्राला आणि पीआर मॉडेलला लोकांनी बळी पडू नये.”

राहुल गांधींनी यापूर्वी आरोप केला की, अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान मोदींप्रमाणेच प्रचार आणि खोट्या आश्वासनांची री ओढत आहेत. राजधानी दिल्लीतील वाढते प्रदूषण, भ्रष्टाचार आणि महागाईला रोखण्यात ते अपयशी ठरले आहेत. तसेच दलित आणि आदिवासींसारख्या उपेक्षित घटकांना त्यांचे हक्क व अधिकार मिळावेत, असे पंतप्रधान किंवा ‘आप’च्या संयोजकांना वाटत नाही, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते अजय माकन आणि शीला दीक्षित यांचे सुपुत्र संदीप दीक्षितही ‘आप’च्या पोस्टरवर दिसत आहेत. अजय माकन यांनी केजरीवाल देशद्रोही असल्याची टीका केली होती. तर संदीप दीक्षित हे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत.

Story img Loader