नवी दिल्ली : लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसवण्यात आल्याने काँग्रेसने त्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेत्याला मागे बसविणे यातून पंतप्रधान मोदी यांना लोकशाही परंपरांचा आदर नसल्याचे दिसून येते, असे काँग्रेसने म्हटले आहे. ‘‘विरोधी पक्षनेत्याचा दर्जा हा कॅबिनेट मंत्र्यासारखा असून सरकारचे मंत्री पहिल्या रांगेत बसतात, मात्र राहुल गांधींना पाचव्या रांगेत बसवले जाते. यावरून तुम्हाला आणि तुमच्या सरकारला लोकशाही, लोकशाही परंपरा आणि विरोधी पक्षनेत्याचा आदर नसल्याचे दिसून येते, असे काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नेहरूंचे नाव नसल्याबद्दल नाराजी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणात स्वातंत्र्य चळवळीतील प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा उल्लेख नसल्याबद्दल काँग्रेसने गुरुवारी तीव्र आक्षेप घेतला. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना इतिहासातून पुसून टाकण्याच्या सततच्या मोहिमेचा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या १५ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री केलेल्या भाषणाची आठवण करून दिली.

Narendra Modi temple Pune, BJP party worker temple pune,
पुण्यात मोदींचे मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्याचा भाजपला ‘रामराम’
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
A case has been registered against Munna Yadav and his two sons for assaulting the police in the police station
पोलीस ठाण्यात पोलिसांना मारहाण, वादग्रस्त भाजप नेते मुन्ना यादव व त्यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : सरकारला सर्वच आंदोलनांची भीती वाटते
Ajit Pawar demand to BJP regarding the post of Chief Minister print politics news
मुख्यमंत्रीपद ‘फिरते’ हवे? अजित पवार यांची भाजपकडे मागणी
Party President Mallikarjun Kharge met by Nana Patole Print politics news
राज्यातील काँग्रेस नेत्यांना सबुरीचा सल्ला; नाना पटोलेंकडून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट
Nana Patole, Rahul Gandhi, Nana Patole on BJP,
राहुल गांधींना जीवे मारण्याचा भाजपाचा मानस – नाना पटोले
Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट