राहुल गांधी अजूनही बाल्यावस्थेत, केजरीवाल यांची टीका

रेल्वे प्रशासन हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते हे राहुल यांना शिकवलेले दिसत नाही.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
राहुल गांधी यांच्या टीकेला महत्त्व न देता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राहुल हे अजूनही बाल्यावस्थेत असल्याचे म्हटले आहे.

दिल्लीत रेल्वे प्रशासनाने अनधिकृत झोपड्या पाडल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केजरीवाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पण राहुल गांधी यांच्या टीकेला महत्त्व न देता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राहुल हे अजूनही बाल्यावस्थेत असल्याचा टोला लगावला आहे.
राहुल यांनी सोमवारी पश्चिम दिल्लीतील शकूर बस्तीतील बेघर झालेल्यांची भेट घेतली. दिल्लीची सत्ता आम आदमीकडे असूनही त्यांचे मंत्री आजही आंदोलन का करत आहेत? असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. त्यावर प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी राहुल गांधी हे अजूनही बाल्यावस्थेत असल्याचे म्हटले. रेल्वे प्रशासन हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते हे राहुल यांना त्यांच्या पक्षातील नेत्यांनी शिकवलेले दिसत नाही. ते अजूनही लहान बालकच आहेत, असा खरमरीत टोला केजरीवाल यांनी लगावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rahul gandhi is still a child says arvind kejriwal