scorecardresearch

Premium

लोकसभेत शिवीगाळ झालेल्या मुस्लीम खासदाराची राहुल गांधींनी घेतली भेट, भावूक होत बसपा नेते म्हणाले…

भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बहुजन समाज पार्टीचे खासदार दानिश अली यांना लोकसभेत शिवीगाळ केली. तसेच त्यांना दहशतवादी म्हणून हिणवलं.

Rahul Gandhi Danish ALi
भाजपा खासदाराने लोकसभेत बसपा खासदाराला शिवीगाळ केली होती. (PC : Twitter Hina Habib/Gabbar)

लोकसभेत भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बहजुन समाज पार्टीचे खासदार दानिश अली यांना शिवीगाळ केली. तसेच दानिश अली यांना उग्रवादी, दहशतवादी असे म्हणत त्यांना संसदेतून बाहेर फेका असेही रमेश बिधुरी म्हणाले. बिधुरी यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस तसेच विरोधी पक्षांमधील नेत्यांनी बिधुरी यांच्या संसदेतील वक्तव्यावर आक्षेप घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीदेखील केली आहे. तसेच रमेश बिधुरी यांच्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पार्टीवरही टीका होत आहे. दरम्यान, याप्रकरणी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माफी मागितली आहे.

लोकसभेतील चर्चेवेळी चांद्रयान मोहिमेचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाटल्याचा आरोप विरोधी पक्षांमधील काही खासदारांनी केला. त्यावर भाजपाचे दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी संतापले आणि विरोधकांना उत्तर देऊ लागले. बिधुरी बोलत असताना बहुजन समाज पार्टीचे खासदार दानिश अली उठून काहीतरी बोलू लागले. यावर बिधुरी यांना संताप आला. संतापलेले रमेश बिधुरी म्हणाले, “मोदीजी श्रेय घेत नाहीयेत. श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. ए भ**…ए उग्रवादी…तुला कधी उभं रहून बोलू देणार नाही. ए उग्रवादी…कटवे…हे दहशतवादी आहेत… उग्रवादी आहेत… हा मुल्ला दहशतवादी आहे. याचं काही ऐकू नका, बाहेर फेका याला.”

Azambhai Pansare supports Sharad Pawar
बालेकिल्ल्यात अजित पवारांना धक्का; जेष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचे शरद पवारांना समर्थन
punjab_congress
पंजाब : ड्रग्ज तस्करी प्रकरणात काँग्रेसच्या आमदाराला अटक, आप-काँग्रेसमधील संघर्ष वाढणार?
Supriya Sule visited Kasba Ganapati
हे गणराया, भाजपा नेत्यांना सुबुद्धी दे – खासदार सुप्रिया सुळे
rohit pawar and ajit pawar
अजित पवारांवर टीका करत रोहित पवार म्हणाले,”भाजपसोबत गेलेल्यांना लोकसभेनंतर कमळावर…”

रमेश बिधुरी यांच्या या वक्तव्यानंतर बिधुरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीवर देशभरातून टीका होत आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी रमेश बिधुरी यांची दिल्लीतल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि खासदार इम्रान प्रतापगढीदेखील राहुल यांच्याबरोबर होते.

हे ही वाचा >> “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

दानिश अली यांच्या भेटीनंतर राहुल गांधी प्रसारमाध्यमांना म्हणाले, तिरस्काराच्या बाजारात प्रेमाचं दुकान सुरू होतंय (नफरत के बजार में मोहब्बत की दुकान खुल रही है). दरम्यान, राहुल गांधी यांच्या भेटीनंतर दानिश अली भावूक झाले. दानिश अली म्हणाले, राहुल गांधी यांना भेटून वाटलं की मी एकटा नाही. राहुल गांधी माझं मनोबल वाढवण्यासाठी आले होते. लोकसभेत झाल्या त्या गोष्टी मनावर घेऊ नका आणि तब्येतीची काळजी घ्या, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या बोलण्याने मला बरं वाटलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rahul gandhi meets danish ali bsp mp became emotional asc

First published on: 22-09-2023 at 23:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×