काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या मध्य प्रदेशातून प्रवास करत आहे. या पदयात्रेतून काही काळ ब्रेक घेत राहुल गांधींनी उज्जैनमधील महाकाल मंदिरात पूजा केली. धोतर, लाल अंगवस्त्र आणि रुद्राक्ष घालून राहुल गांधी देवाच्या चरणी लीन झालेले पाहायला मिळाले. यावेळी गांधींनी भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला. “भाजपा हात जोडून देवाची पूजा करते, पण देशाचं भविष्य असलेले शेतकरी, कामगार, छोटे-मध्यम व्यापारी आणि सुशिक्षित तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करते”, असा हल्लाबोल गांधींनी केला आहे.

“या देशात तपस्वींची पूजा केली जाते. मीदेखील गेल्या तीन महिन्यांपासून तपस्या करत आहे. पण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तपस्या करणाऱ्या शेतकरी आणि कामगार या खऱ्या तपस्वींसमोर ही तपस्या अगदी तोकडी आहे”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. या लोकांना सरकारकडून जे मिळायला हवं ते मिळत नसल्याची खंत राहुल गांधींनी यावेळी व्यक्त केली. भाजपावर निशाणा साधताना राहुल गांधी पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना एकतर खतं मिळत नाहीत, किंवा ती मिळाली तर चढ्या भावाने मिळतात. त्यांच्या पिकांची योग्य किंमत त्यांना मिळत नाही. पूर्ण प्रीमियम भरूनही पीक नुकसानासाठी विमा कंपन्यांकडून भरपाई दिली जात नाही”, अशी टीका गांधींनी यावेळी केली.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा

“भाजपा आणि RSSचे नेते आंबेडकरांसमोर हात जोडतात, नंतर पाठीत वार करतात” राहुल गांधींचं टीकास्र!

७ सप्टेंबरला मध्य प्रदेशातून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा २३ नोव्हेंबरला मध्य प्रदेशात दाखल झाली आहे. या यात्रेत प्रियांका गांधीही सहभागी झाल्या होत्या. या यात्रेदरम्यान गांधी कुटुंबियांनी ओंकारेश्वर मंदिरात नर्मदेची आरती केली. मध्य प्रदेशात २०१८ मध्ये काँग्रेसने विधानसभा निवडणूक जिंकली होती. मात्र, त्यानंतर दोन वर्षात ज्योतिरादित्य सिंधिया भाजपात दाखल झाल्यानंतर हे सरकार कोसळले. या यात्रेच्या माध्यमातून मध्य प्रदेशात पुन्हा सत्ता काबिज करण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.