मागील काही दिवसांपासून देशभरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो आहे. अशातच देशात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा फटका राजकीय नेत्यांनाही बसतो आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही उन्हामुळे चांगलाच त्रास सहन करावा लागला आहे. उन्हामुळे त्रासलेल्या राहुल गांधीनी भाषणदरम्यान चक्क थंड पाणी डोक्यावर ओतले. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

राहुल गांधी हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी रुद्रपूरमध्ये त्यांची सभा पार पडली. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी पाणी पिण्यासाठी बॉटल हातात घेतली. तेवढ्यात नागरिकांनी गर्मी गर्मी असं म्हणत ओरडायला सुरुवात केली. तेवढ्यात आज जास्तच गर्मी आहे, असं म्हणत त्यांनी थेट थंड पाणीच डोक्यावर ओतले. त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

Man Sexually Assault Dogs
रस्त्यात श्वानांच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावणाऱ्या विकृताचा Video व्हायरल; लहान मुलगी अत्याचार पाहून थांबवायला गेली पण..
Women Fight Due To A Land Dispute In Pune Video Goes Viral
VIDEO: पुण्यात जमिनीचा वाद टोकाला गेला; बांधावरच एकमेकींच्या जीवावर उठल्या बायका, अखेर असं संपलं भांडण
Investigation closed by ED too Failure to trace the source of income in the offenses against the vicar
‘ईडी’कडूनही तपास बंद? वायकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांत उत्पन्नाचा स्राोत शोधण्यात अपयश
Team india Victory Parade Updates open bus road show at Marine Drive and Wankhede
रोड शोनंतर मरीन ड्राईव्हची कशी आहे परिस्थिती? चपलांचा ढीग अन्… VIDEO मध्ये पाहा क्वीन नेकलेसवरील सद्यस्थिती!
Ayodhya Women Falls In Pothole Viral Video
अयोध्येत ८४४ कोटी खर्च करून बांधलेल्या रस्त्यावर खड्डा? ४८ वर्षीय मारिया पडल्याने होतेय भयंकर टीका, पण ही महिला आहे तरी कोण?
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
epilepsy permanent relief marathi news
विश्लेषण: ‘एपिलेप्सी’च्या झटक्यांपासून कायमची मुक्ती? ब्रिटनमधील क्रांतिकारी संशोधन काय आहे?
west bengol
पश्चिम बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला बेदम मारहाण, रस्त्यावरील ‘त्या’ कृत्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही संताप!

हेही वाचा – राहुल गांधीच्या रॅलीच्या स्वागतासाठी गायीची हत्या? लोकांनी जीपवर गायीचा मृतदेह का बांधला, भीषण सत्य वाचून हादरून जाल

दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “ही लढाई विचारधारेची लढाई आहे. एकीकडे इंडिया आघाडी आहे, तर दुसरीकडे ते लोक आहेत, ज्यांना संविधान बदलायचं आहे. भाजपाच्या नेत्यांनी संविधान बदलणार असल्याचे जाहीरपणे सांगितलं आहे. मात्र, इंडिया आघाडी असं कधीही होऊ देणार नाही. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाने देशातील मागसवर्गीयांना त्यांचा हक्क मिळाला आहे. याच संविधानाने त्यांना आरक्षण दिलं आहे. मात्र, भाजपाला दलित-पीडितांचे आरक्षण रद्द करायचं आहे”, असे म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी अग्नीवीर योजनेवरूनही मोदी सरकारला लक्ष्य केलं. “अग्नीवीर योजनेद्वारे मोदी सरकारने देशातील सैनिकांना मजदुरांमध्ये बदलण्याचं काम केलं आहे. आता सीमेवर शहीद झाल्यास त्यांना पेन्शन किंवा शहिदांचा दर्जा मिळणार नाही. मात्र, इंडिया आघाडीचं सरकार आल्यास आम्ही ही योजना रद्द करू”, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा – “पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशमधील सरकार पाडण्याचं खुलं आव्हान दिलं”, राहुल गांधींचा दावा

“पंतप्रधान मोदी म्हणतात की त्यांचा जन्म आईवडिलांपासून झाला नाही, परमेश्वाराने त्यांना एका उद्देशाने पाठवलं आहे. मात्र, खरं हे की परमेश्वराने त्यांना अदाणी-अंबानी यांच्या मदतीसाठी पाठवलं आहे. जर त्यांना खरंच परमेश्वराने पाठवलं असतं तर त्यांनी देशातील गरिबांसाठी आणि वंचितासाठी काम केलं असतं. मात्र त्यांच्या परमेश्वाराने त्यांना सांगितलं की जा आणि अदानी अंबानीची मदत करा”, असा टोलाही त्यांनी लगावला.