राहुल गांधी व प्रियंका गांधी- वढेरा हे काँग्रेसचे नेते ‘अननुभवी’ असल्याचे मत पंजाबचे माजी मुख्यमंत्री अर्मंरदर सिंह यांनी बुधवारी व्यक्त केले. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधात आपण दमदार उमेदवार उभा करू, असेही त्यांनी सांगितले.

प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत भांडणांच्या पाश्र्वाभूमीवर अमरिंदर यांनी अलीकडेच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि सिद्धू यांचे वर्णन ‘देशद्रोही’ व ‘धोकादायक’ असे केले होते.

सिद्धू यांना पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी बढती देण्यास आपण प्राणपणाने विरोध करू, असे सिंग यांनी अनेक मुलाखतींध्ये सांगितले. अशा ‘धोकादायक माणसापासून’ देशाला वाचवण्यासाठी आपण कुठलाही त्याग करण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धू यांचा पराभव निश्चित करण्यासाठी आपण त्यांच्या विरोधात ताकदवान उमेदवार उभा करू, असे सिंग यांनी सांगितले.