खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ काश्मीरमध्ये असून यात्रेची सोमवारी (३० जानेवारी) सांगता होत आहे. आज (२९ जानेवारी) राहुल गांधी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या आगामी राजकीय वाटचालविषयी भाष्य केले आहे. माझ्या डोक्यात दोन-तीन चांगल्या कल्पना आहेत, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भारत जोडो यात्रेने नेमकं काय साधलं? राहुल गांधी यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

थोडा वेळ गरजेचा आहे, पुढील काळात…

कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढण्यात आली. ही यात्रा आता संपत आहे. त्यामुळे आता देशात पूर्व ते पश्चिम अशी आणखी एखाद्या यात्रेचे आयोजन करणार का? असे राहुल गांधी यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी सूचक विधान केल आहे. “आताच भारत जोडो यात्रा समाप्त झाली आहे. या यात्रेत लोक हजारो किलोमीटर चालले आहेत. त्यामुळे थोडा वेळ गरजेचा आहे. पुढील काळात काय होते ते पाहुयात,” असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा >>> राहुल गांधींनी लाल चौकात फडकवला तिरंगा, अशी कामगिरी करणारे ठरले दुसरे काँग्रेस नेते

…नाही त्याबाबत विचार करूयात

“ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी पार पडली. मा या यात्रेचा प्रभाव संपूर्ण देशात आहे. ही यात्रा म्हणजे एक दृष्टीकोन आहे. देशासाठी ही एक जगण्याची पद्धत आहे. काँग्रेस पक्ष तसेच आमच्या कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते. राष्ट्रीय पातळीवर या यात्रेचा प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी एखादी यात्रा काढायची की नाही त्याबाबत विचार करुयात. माझ्याकडे आणखी दोन-तीन चांगल्या कल्पना आहेत. त्यामुळे बघुयात,” असे विधान राहुल गांधी यांनी केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi said have two or three better ideas like bharat jodo yatra prd
First published on: 29-01-2023 at 19:34 IST