rahul gandhi take responsibility gujarat election loses gujarat election 2022 ssa 97 | Loksatta

Gujarat Election Result 2022 : गुजरातमधील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “कठोर परिश्रम करू आणि…”

गुजरातमध्ये काँग्रेसला केवळ १६ जागांवर समाधान मानावे लागलं आहे.

Gujarat Election Result 2022 : गुजरातमधील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “कठोर परिश्रम करू आणि…”
राहुल गांधी (ट्वीटर छायाचित्र)

गुजरात निवडणुकीकडे सर्व देशाचं लक्ष लागलं होतं. गुजरात निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. सलग सातव्यांदा भाजपा गुजरातमध्ये सत्ता स्थापन करत आहे. तर, काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. गुजरातमध्ये भाजपा १५८ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसचे केवळ १६ च उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसत आहे. गुजरातमधील पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे,

गुजरातमधील पराभव राहुल गांधी यांनी स्वीकारला आहे. ट्वीट करत राहुल गांधी म्हणाले, “गुजरातच्या जनतेचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. देशाच्या आदर्शासाठी आणि गुजरातमधील जनतेच्या हक्कांसाठी आम्ही पुनर्बांधणी करु, पुन्हा कठोर परिश्रम करु आणि लढत राहू,” असं राहुल गांधींनी म्हटलं.

दरम्यान, मागील वेळी भाजपाला ९९ जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसला ७७ जागा मिळत भाजपा मोठी टक्कर दिली होती. यंदा काँग्रेस भाजपाविरुद्ध आक्रमकपणे उतरण्याची आशा होती. पण, ‘आप’ला मोठ्या प्रमाणात मते मिळाल्याने काँग्रेसचे मनसुबे उधळले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 17:44 IST
Next Story
मैनपुरीमध्ये सपाचा बोलबाला! अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव २ लाख ८८ हजार मतांच्या फरकाने विजयी