VIDEO: पदयात्रेतून ब्रेक घेत राहुल गांधींनी चालवली बाईक, 'भारत जोडो' यात्रेत दिसला खास अंदाजRahul Gandhi was seen riding a bike in Indore Madhya Pradesh during Bharat Jodo Yatra | Loksatta

VIDEO: पदयात्रेतून ब्रेक घेत राहुल गांधींनी चालवली बाईक, ‘भारत जोडो’ यात्रेत दिसला खास अंदाज

या व्हिडीओत राहुल गांधी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात ब्लू कार्पेटवर बाईक चालवताना दिसत आहेत.

VIDEO: पदयात्रेतून ब्रेक घेत राहुल गांधींनी चालवली बाईक, ‘भारत जोडो’ यात्रेत दिसला खास अंदाज
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहुल गांधींनी बाईक चालवण्याचा आनंद लुटला. (फोटो-एएनआय)

मध्य प्रदेशातील ‘भारत जोडो’ यात्रेच्या प्रवासाची सुरुवात रविवारी मोठ्या उत्साहात झाली. या यात्रेदरम्यान इंदूरमध्ये खासदार राहुल गांधींनी बाईक चालवण्याचा आनंद लुटला. गेल्या काही वर्षात एकामागोमाग झालेल्या पराभवानंतर जनतेशी जनसंपर्क वाढवण्यासाठी काढण्यात आलेली कन्याकुमारी ते श्रीनगर अशी ही ‘भारत जोडो’ यात्रा सध्या मध्य प्रदेशातून प्रवास करत आहे.

या व्हिडीओत राहुल गांधी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात ब्लू कार्पेटवर बाईक चालवताना दिसत आहेत. यावेळी रस्ता मोकळा करण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांची बरीच दमछाक झालेली पाहायला मिळाली. पदयात्रेदरम्यान निवांत क्षणी फुटबॉल खेळतानाचा राहुल गांधींचा व्हिडीओ नुकताच समोर आला होता. आदिवासींसोबत नृत्याचा आनंदही लुटताना ते दिसले होते.

२०० CCTV, सहा शहरं, लॉजवर छापे अन्…; राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा नरेंद्र सिंह सापडला

मध्य प्रदेशातील या पदयात्रेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीदेखील सहभागी झाल्या आहेत. आगामी २०२४ मधील निवडणुकीसाठी काँग्रेसकडून या पदयात्रेद्वारे मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. पदयात्रेदरम्यान काहींनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्लेषण : आदिवासी आणि वनवासी शब्दावरून घमासान, राहुल गांधींचा आक्षेप आणि भाजपा-RSS चं स्पष्टीकरण काय?

गुजरात निवडणूक प्रचारात सक्रीय नसल्याची टीका होत असतानाच पदयात्रा सुरू ठेवण्यावर राहुल गांधी भर देताना दिसत आहेत. गुजरातमध्ये गेल्याच आठवड्याच त्यांनी एका सभेला संबोधित केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 12:40 IST
Next Story
भाजपा खासदाराच्या इशाऱ्यानंतर एका रात्रीत बसस्टॉपवरील घुमट गायब, कर्नाटकच्या म्हैसूरमधील घटना