शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी रविवारी ( २५ डिसेंबर ) पत्रकार परिषद घेत त्यांच्या बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगशी संबंध असल्याचं सांगितलं. तसेच, या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत ( एनआयए ) चौकशी करण्याची मागणी शेवाळेंनी केली होती. याला आता पीडित महिलेने प्रत्युत्तर दिलं आहे. मी भारत मातेची कन्या असून, मला आणि देशाला बदनाम केलं जात आहे, असं त्या पीडितेनं ट्वीट करत म्हटलं आहे.

पीडित महिला म्हणाली की, “खासदार राहुल शेवाळेंनी माझ्यावर पाकिस्तान आणि दाऊदशी संबंध असल्याचं खोटे आरोप केले. कारण, शेवाळे आपले गुन्हे लपवत आहेत. राहुळ शेवाळेंनी माझ्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले आहेत. मला भिती घातली आहे, खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. साकीनाका पोलीस ठाण्यात मी गुन्हा दाखल केला असला तरी, राजकीय दबावामुळे तो घेण्यात आला नाही. मला सातत्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.”

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?

हेही वाचा :  “माझा फोन ६८ दिवस टॅप केला गेला, आता मला भीती वाटते की…” एकनाथ खडसेंचं विधानपरिषदेत विधान!

“मी फॅशन डिझायनर असून, दुबईत माझ्या करिअरला सुरुवात केली. दुबईत भारतीय, पाकिस्तानी, बांग्लादेशी आणि अमेरिकन माझे मित्र होते. एनआयएने माझे फोन डिटेल्स तपासून पाहावे. दुबईतही मी याविरोधात आवाज उठवल्यावर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करत जेलमध्ये टाकण्यात आलं. दुबईत मला भेटण्यास आल्यानंतर राहुल शेवाळे कुठे जात होते. किती वेळा कराची आणि पाकिस्तानला गेले आहेत. कोणत्या देशात गेले, याचा तपास एनआयएने करावा,” अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.

हेही वाचा : “मी असा विरोधी पक्षच पाहिलेला नाही जो स्वतःच्या काळातल्या गोष्टी….” देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला

राहुल शेवाळे काय म्हणाले होते?

राहुल शेवाळेंनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत म्हटलं की, “दुबईत रईस नावाचा व्यक्ती दाऊदचं काम करतो. त्याच्यासोबत माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे संबंध आहेत. ही महिला दाऊद गँगबरोबर आहे, असं मी खात्रीशीरपणे सांगतो.”

“ही महिला दाऊद गँगची आहे”

“या लोकांची पाकिस्तानमध्ये एक गँग आहे. त्या गँगमध्ये फराह म्हणून एक महिला आहे. तीही या महिलेबरोबर आहे. ही महिला फराहबरोबर दोनदा कराचीलाही जाऊन आली आहे. त्यामुळे पाकिस्तान कनेक्शन, दाऊद गँगचं कनेक्शन यामुळे हे वेगळं प्रकरण आहे. ही महिला दाऊद गँगची आहे,” असा आरोप शेवाळेंनी केला होता.