नवी दिल्ली : लोकसभेत दहा वर्षांनंतर विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार असून हे पद राहुल गांधींनी स्वीकारावे अशी जोरदार मागणी शनिवारी झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. या प्रस्तावाचा विचार करून निर्णय घेऊ, असे राहुल गांधींनी नेत्यांना सांगितल्याचे समजते.

२०१४ व २०१९ मध्ये काँग्रेस हा विरोधी पक्षांतील मोठा पक्ष असला तरी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी किमान दहा टक्के जागा म्हणजे ५५ जागा पक्षाने जिंकल्या नव्हत्या. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद दिले गेले नव्हते. आता मात्र, सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळू शकेल.

Key takeaways from PM Modi replies in Parliament
हिंदू धर्म ते मणिपूर! विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान मोदींनी काय उत्तरे दिली?
PM Narendra Modi Mocks Rahul Gandhi
नरेंद्र मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, “काँग्रेसकडून पडलेल्या लहान पोराचं मन रमवण्याचा प्रकार..”
Krupal Tumane, Krupal Tumane latest news,
लोकसभेची उमेदवारी नाकारलेल्या तुमाने, भावना गवळींचे पुनर्वसन
Pankaja Munde maharashtra legislative councile
मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी!
lok sabha to witness first contest for post of speaker since 1976
लोकसभा अध्यक्षपदासाठी लढत; काँग्रेसची उपाध्यक्षपदाची अट भाजपला अमान्य; ४७ वर्षांनंतर पदासाठी निवडणूक
rahul gandhi appointed as LoP in loksabha
मोठी बातमी! लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधीच्या नावावर शिक्कामोर्तब; के.सी. वेणूगोपाल यांची माहिती
Congress Lok Sabha Speaker Election
लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक; काँग्रेसकडून खासदारांना व्हिप जारी, संसदेत हजर राहण्याच्या सूचना
Lok Sabha Zilla Parishad Chairman to MP Smita Wagh
नव्या लोकसभेचे नवे चेहेरे: जिल्हा परिषद अध्यक्ष ते खासदार…, स्मिता वाघ ,जळगाव, भाजप

हेही वाचा >>>काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड; मल्लिकार्जून खरगेंचा प्रस्ताव एकमताने मंजूर!

बैठकीमध्ये राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारावी असा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार यांनी राहुल गांधींसंदर्भातील प्रस्ताव मांडला व शशी थरूर यांनी अनुमोदन दिले. प्रामुख्याने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी व प्रियंका गांधी-वाड्रा यांनी प्रचार केला होता. यावेळी काँग्रेसच्या यश मिळाले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनीच विरोधी पक्षनेते झाले पाहिजे, असे मत शिवकुमार व थरूर यांनी व्यक्त केले.

रायबरेली की, वायनाड?

राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली व केरळमधील वायनाड या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून विजयी झाले आहेत. मात्र, या दोनपैकी एक जागा त्यांना सोडावी लागेल. त्याबाबत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर १४ दिवसांमध्ये निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे १७ जूनपर्यंत राहुल गांधी रायबरेली की वायनाडचे खासदार राहतील हे स्पष्ट होईल. पुढील दोन वर्षांनी केरळमध्ये विधानसभा निवडूक होणार असल्याने राहुल गांधींनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देऊ नये, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे तर, रायबरेली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून तिथून राजीनामा दिल्यास चुकीचे संदेश दिला जाईल असेही मानले जात आहे.