अतिवृष्टीमुळे आंध्र प्रदेशातील लोहमार्ग, रस्ते उद्ध्वस्त

बस सेवा विस्कळीत झाल्याने शेकडो प्रवासी नेल्लोरच्या राज्य परिवहन बस स्थानकावर खोळंबले आहेत.

अमरावती : आंध्र प्रदेशात पेन्ना नदीच्या वाढलेल्या पातळीमुळे रविवारी प्रचंड विध्वंस झाल्याने दक्षिण व पूर्व भागांना जोडणाऱ्या आंध्र प्रदेशातील प्रमुख रेल्वे व रस्ते मार्गाचा देशाच्या इतर भागांशी संपर्क तुटला.

एसपीएस नेल्लोर जिल्ह्य़ात पडुगुपाडु येथे रस्ता खचल्यामुळे चेन्नई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ वाहतुकीसाठी बंद करावा लागला.

पडुगुपाडु येथे रेल्वे मार्गावर पुराचे पाणी ओसंडून वाहत असल्यामुळे चेन्नई-विजयवाडा ग्रँड ट्रंक मार्गावरील किमान १७ एक्स्प्रेस गाडय़ा रद्द करण्यात आल्या. इतर तीन गाडय़ा अंशत: रद्द करण्यात आल्या किंवा त्यांचे मार्ग बदलण्यात आले.

नेल्लोर जिल्ह्य़ातील सोमशिला जलाशयातून दोन लाख क्युसेक्सहून अधिक पाणी वाहून गेल्याचे राज्य आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. यामुळे कोवुरु येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ वरील वाहतूक ठप्प झाली. परिणामी, या महामार्गावरील नेल्लोर आणि विजयवाडादरम्यानची वाहतूक स्थगित ठेवण्यात आल्याने दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने अडकून पडली आहेत.

बस सेवा विस्कळीत झाल्याने शेकडो प्रवासी नेल्लोरच्या राज्य परिवहन बस स्थानकावर खोळंबले आहेत.

कडपा जिल्ह्य़ात पापाग्नी नदीवरील एक पूल कमलापुरम येथे कोसळल्याने कडपा व अनंतपुरम जिल्ह्य़ांदरम्यानची रस्ते वाहतूक खंडित झाली. वेलिगल्लु जलाशयातून ओसंडून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे हा पूल कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कडपा शहरा रविवारी पहाटे एक तीन मजली इमारत कोसळली, मात्र या घटनेच्या काही वेळ आधी येथील रहिवासी बाहेर पळाल्याने यात जीवहानी झाली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rail road routes cut off in andhra pradesh due to heavy floods zws

ताज्या बातम्या