Bikaner Guwahati Express Accident : पटनावरुन गुवाहटीच्या दिशेने जाणाऱ्या बीकानेर एक्सप्रेसला ( गाडी नंबर – १५६३३ ) आज संध्याकाळी पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी भागात मोयनागुडी रेल्वे स्थानकाच्या जवळ हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार २४ डबे असलेल्या एक्सप्रेसचे इंजिनच्या जवळचे १२ डबे रुळावरुन खाली घसरले. या अपघातात एकूण ४ जणांचा मृत्यू झाला.

या अपघातात जवळपास ५० लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी मदत करणारी विविध पथके पोहचली असून स्थानिकांच्या मदतीने जखमी लोकांना बाहेर काढण्याचे, उपचार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. भारतीय रेल्वेने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच जखमींना प्रत्येकी २५ हजार रुपये दिले जाणार आहेत.

traffic jam, Thane Belapur road, breaking of height barrier
हाईट बॅरियर तुटल्याने ठाणे बेलापूर मार्गावर मोठी कोंडी
south east central railway recruitment 2024 Job opportunities in south east central railway
नोकरीची संधी : ‘दक्षिण पूर्व मध्य रेल्वे’मधील संधी
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली

हेही वाचा : हिंगोली जिल्ह्यात खासगी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू,२४ जखमी

नेमका हा अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट झालं नाहीये. या भागात धुकं असल्यानं आणि आता अंधार पडल्यानं मदत कार्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.