डिसेंबरपासून रेल्वेची खानपानसेवाही पूर्ववत

देशभरात रेल्वेसेवा पूर्ववत झाली असून दिवसभरात १७६८ लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात आहेत.

नवी दिल्ली : करोना महासाथीच्या काळात वर्षभरापूर्वी बंद करण्यात आलेली रेल्वेसेवा आता पूर्णत: सुरू झाली असून रेल्वेगाड्यांत शिजविलेले अन्नपदार्थ पुन्हा देण्याचा निर्णय शुक्रवारी रेल्वेने घेतला. गतवर्षी करोना निर्बंधांमुळे रेल्वेतील खानपान सेवा थांबविण्यात आली होती.

देशभरात रेल्वेसेवा पूर्ववत झाली असून दिवसभरात १७६८ लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात आहेत. सध्या केवळ राजधानी, शताब्दी आणि अन्य गाड्यांत तयार अन्नपदार्थ, पाकिटबंद अन्न देण्यास परवानगी आहे.  प्रवाशांच्या मागणीनुसार तयार अन्नपदार्थ यापुढेही पुरविले जातील.  शिजविलेले अन्नपदार्थ देण्याचा निर्णय १डिसेंबरपासून अंमलात येऊ शकतो. अर्थात खानपानसेवचा परवाना दिलेल्यांच्या तयारीवर हे अवलंबून असेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेतील खानपानसेवा पुरवठादरांसाठी लवकरच ‘आयआरसीटीसी’कडून नव्याने निविदा मागविल्या जाणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Railway catering also resumed from december food cooked in trains akp

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या