बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री झालेल्या तिहेरी रेल्वे अपघाताच्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणची रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली. दुरुस्त करण्यात आलेल्या रेल्वे मार्गावरून सोमवारी सकाळी हावडा-पुरी वंदे भारत एक्सप्रेस धावली. दरम्यान, सुमारे २७५ प्रवासी ठार झालेल्या या अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे.

वंदे भारत एक्सप्रेसने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता बाहानगा बाजार स्थानकावरून पुढे गेली. आता रेल्वे मार्ग अप व डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतुकीसाठी योग्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे अपघातस्थळी उपस्थित होते आणि ही अर्ध-जलद गाडी तेथून गेली तेव्हा त्यांनी चालकांना हात दाखवून अभिवादन केले.

Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
Pune-Daund suburban service,
रेल्वे प्रवाशांचा मतदानावर बहिष्कार! पुणे-दौंड उपनगरी सेवा सुरू होत नसल्याने पाऊल
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

हावडा-पुरी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर- नवी दिल्ली संपर्क क्रांती एक्सप्रेस या दोन प्रवासी गाडय़ाही सोमवारी सकाळी अनुक्रमे अप व डाऊन मार्गावरून गेल्या. त्यापूर्वी कोळसा घेऊन विशाखापट्टणमवरून राऊरकेला पोलाद संयत्राकडे जाणारी एक मालगाडी रविवारी रात्री १०.४० वाजता याच मार्गावरून गेली. या ठिकाणी गाडय़ा कमी वेगाने धावत आहेत.

दरम्यान, रेल्वे सुरक्षा आयुक्त (दक्षिण पूर्व मंडळ) शैलेश कुमार पाठक यांनी या अपघाताची चौकशी सुरू केली आणि बाहानगा बाजार स्थानकावरील अपघातस्थळाला भेट दिली. त्यांनी नियंत्रण कक्षाचे निरीक्षण केले, स्थानक व्यवस्थापकांशी चर्चा केली, तसेच ज्यामुळे कोरोमंडल एक्सप्रेस लूप लाईनवर शिरली होती, त्या इंटरिलकिंग यंत्रणेचीही पाहणी केली.

 ‘आम्ही नुकतीच चौकशी सुरू केली आहे. तिला वेळ लागेल. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण निश्चितपणे कळू शकेल’, असे पाठक यांनी अपघातस्थळी पत्रकारांना सांगितले.

एनडीआरएफमाघारी

अपघातस्थळी तैनात करण्यात आलेली आपली सर्व नऊ पथके परत घेऊन राष्ट्रीय आपदा प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) या ठिकाणचे बचावकार्य सोमवारी संपवले. शुक्रवारच्या अपघातानंतर घटनास्थळी पथके तैनात करण्यात आल्यापासून या दलाने ४४ जणांची सुटका केली आणि १२१ मृतदेह बाहेर काढले.

बाहानगा बाजार स्थानकाजवळील अपघातस्थळी कुणीही जिवंत किंवा मृत अपघातग्रस्त नसल्यामुळे ही मोहीम संपली असून सर्व नऊ पथके माघारी घेण्यात आली आहेत. बालासोर, मुंडाली व कोलकाता येथून पाठवण्यात आलेल्या या नऊ पथकांनी राज्य आपदा दले आणि स्थानिक प्रशासन यांच्यासोबत मदत व बचावकार्य केले.