रेल्वेच्या प्रथम दर्जाच्या आणि वातानुकुलित प्रवासासाठी १ जुनपासून प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे १ जुनपासून सेवा करातील नव्या तरतुदी अंमलात येत असल्यामुळे रेल्वेने ०.५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रेल्वेच्या प्रथम दर्जा, वातानुकुलित दर्जा आणि मालवाहतुकीसाठी ३.७०८ इतका सेवा कर आकारला जात होता. आत्ता यामध्ये ०.५ टक्क्यांची वाढ होऊन तो ४.२ टक्क्यांवर जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली.  त्यामुळे तुम्हाला सध्या वातानुकुलित प्रवासासाठी १००० हजार रूपये मोजवे लागत असतील, तर आता त्यामध्ये १० रूपयांची वाढ होईल. १ जूनपासून खरेदी करण्यात येणाऱ्या तिकीटांसाठी ही दरवाढ लागू ठरेल.