राजस्थानमध्ये व्हॅन- ट्रकच्या भीषण धडकेत १८ ठार; ४० जखमी

पीकअप व्हॅन आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १८ जण ठार झाले.

राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्री एक पीकअप व्हॅन आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १८ जण ठार झाले. तर ४० प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्वजण मजूर असून, यात ११ महिला आहेत.
माहितीनुसार, वेगात आलेल्या ट्रकने पीकअपव्हॅनला धड़क दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चौघांचा रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. १५ जखमींना उदयपूर येथील तर, एकाला प्रतापगड येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. पीकअप व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते. पिकअपमध्ये बसलेले लोक छोटी सादडी येथे जात असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या अपघातातीत सर्वांच मृतांची ओळख पटली नसून पोलीस तपास सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rajasthan 18 killed after overloaded pickup van rams into truck

ताज्या बातम्या