Rajasthan By-Election Updates Deoli-Uniara Assembly constituency : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील देवळी-उनियारा मतदारसंघात बुधवारी (१३ नोव्हेंबर) पोटनिवडणूक पार पडली. येथून निवडणुकीला उभे राहिलेले अपक्ष उमेदवार नरेश मीना यांनी काल मतदानाच्या दिवशी उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांच्या कानशीलात लगावल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे मतदारसंघात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या मागण्यांवरून चौधरी व नरेश मीना यांच्यात वाद चालू होता. त्याचदरम्यान, मीना यांचं स्वतःवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांनी थेट उपविभागीय दंडाधिकाऱ्यांवर हल्ला केला. मीना यांनी चौधरी यांच्या कानशीलातही लगावली. त्यानंतर मीना यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याचवेळी मीना यांच्या शेकडो समर्थकांनी हिंसक निदर्शने केली. त्यामुळे पोलिसांना त्यांचं काम करता येत नव्हतं. मीना यांच्या समर्थकांनी परिसरातील अनेक वाहनं पेटवली, पोलिसांच्या वाहनांवर दगडफेकही केली. त्यामुळे पोलिसांना आंदोककांवर अश्रू धुराचा मारा करावा लागला. हे हिंसक आंदोलन मोडून काढत पोलिसांनी अखेर आज सकाळी मीना यांना अटक केली आहे.

देवळी उनियारा विधानसभा मतदारसंघातील समरावता गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. ग्रामस्थांची तक्रार आहे की त्यांचं गाव पूर्वी उनियारा उपखंडात होतं. मात्र, आधीच्या सरकारने त्यांचं गाव उनियारामधून हटवलं आणि देवळी उपखंडात समाविष्ट केलं आहे. त्यामुळे ग्रामस्थ सरकारवर संतप्त आहेत. ग्रामस्थ गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचं गाव उनियारामध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत. मात्र सरकारने त्यावर कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत. परिणामी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.त्यामुळे स्थानिक पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एक पथक उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गावात आलं. सर्व अधिकारी-कर्मचारी ग्रामस्थांचं समुपदेशन करत असतानाच नरेश मीना तिथे आले. यावेळी त्यांची अमित चौधरी यांच्याबरोबर बाचाबाची झाली. त्याचं रुपांतर मोठ्या भांडणात व हाणामारीत झालं. मीना यांनी चौधरींना मारहाण केली. जवळच उभे असलेल्या पोलिसांनी चौधरी यांना मीना यांच्या तावडीतून सोडवलं. मीना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस त्यांना अटक करण्यासाठी समरावता गावात दाखल झाले असतानाच मीना समर्थकांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला.

Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
Docandrakant Nimbarte of Congress supports the candidate of the Grand Alliance
काँग्रेसचे डॉ.चंद्रकांत निंबार्ते यांचा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Ajit Pawar vs Yugendra Pawar, Baramati, Baramati voters,
बारामतीत अटीतटीचा सामना, अजित पवार की युगेंद्र… मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवार यांच्या सभेची चर्चा
Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका

पेटलेले टायर्स फेकून पोलिसांची कार अडवली

मीना यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घराजवळ येत असताना मीना यांच्या समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळून टाकले होते. मीनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार पुढे जाऊ दिली नाही. बुधवारी रात्री समरावता गावात तणाव निर्माण झाला होता. मीना समर्थकांनी गावात अनेक ठिकाणी जाळपोळ केली आहे. या जाळपोळीचे अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

हे ही वाचा >> पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष

दरम्यान, अजमेरचे पोलीस महानिरीक्षक ओम प्रकाश यांनी सांगितलं आहे की हिंसाचार करणाऱ्या ६० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसेत गावात २४ मोठी वाहनं, ४८ मोटारसायकली पेटवल्या गेल्या आहेत. अनेक घरांवर दगडफेक झाली असून या घरांचं नुकसान झालं आहे. गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सला (एसटीएफ) गावात पाचारण करण्यात आलं आहे. टास्क फोर्सने गुरुवारी सकाळी अनेकांना ताब्यात घेतलं आहे. गावात व आसपासच्या प्रदेशात शांतता निर्माण करणे हे या एसटीएफसमोरचं मोठं आव्हान आहे.