scorecardresearch

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचे नाव आघाडीवर, राजस्थान काँग्रेसकडून ठराव मंजूर

१७ ऑक्टोबरला काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचे नाव आघाडीवर, राजस्थान काँग्रेसकडून ठराव मंजूर
काँग्रेस खासदार राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

Congress President Election: खासदार राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनावेत, यासाठी राजस्थान काँग्रेसने एक ठराव मंजूर केला आहे. येत्या १७ ऑक्टोबरला काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्याआधी पक्षांअंतर्गत हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, पुद्दुचेरी प्रदेश काँग्रेसनेही राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष व्हावेत, अशी मागणी केली आहे. त्यासाठी ठरावदेखील पारित करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश काँग्रेस सोमवारी अशाचप्रकारचा ठराव मंजूर करण्याच्या तयारीत आहे.

प्रदेश काँग्रेसचे ठराव झाले तरी, पक्षाध्यक्षपदाची निवडणूक होणारच!; निवडणूक विभागप्रमुख मधुसूदन मिस्त्रींचे स्पष्टीकरण

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल गांधी यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेस अध्यक्षांना प्रदेश काँग्रेस कमिटी आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्यांच्या नियुक्तीचे अधिकार देण्याबाबतचा ठराव सर्व राज्यांमध्ये संमत केला जात आहे, अशी माहिती दिल्लीतील पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसुदन मिस्त्री यांनी दिली होती. त्यानुसार सर्व राज्यांकडून अशाप्रकारचे ठराव संमत केले जात आहेत. दरम्यान, राहुल गांधीनी काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी मागणी अनेक राज्यांमधील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Congress Election : ४५ वर्षांत प्रथमच काँग्रेस कार्यकारिणीच्या पदांसाठी निवडणुका घेण्याची घोषणा

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी येत्या २० सप्टेंबरला अधिसूचना निघणार आहे. २४ ते ३० सप्टेंबर या काळात उमेदवारी अर्ज भरले जातील. आठ दिवसांमध्ये हे अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर १७ ऑक्टोबरला पक्षाध्यक्ष पदासाठी मतदान होईल, अशी माहिती मिस्त्री यांनी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसने राष्ट्रीय कार्यकारणीसाठीही निवडणूक घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या ४५ वर्षांत पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारणीची निवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेसचे राज्य निवडणूक अधिकारी सर्व राज्यांना भेट देणार असून प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असे मिस्त्री यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या