विम्याचे २ कोटी रुपये मिळावेत म्हणून एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून करण्याची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. राजस्थानमधील उदयपूर येथील महेश चंद्रा नावाच्या व्यक्तीने हा कट रचला. कार आणि दुचाकी यांच्यातील अपघाताची चौकशी करताना पोलिसांना या कटाचा सुगावा लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आपल्या पत्नीला संपवण्यासाठी १० लाख रुपयांची सुपारी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी महेश चंद्रा, मुकेश सिंग राठोड, राकेश कुमार आणि सोनू सिंग यांना अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>>स्वत: भाजपाच्या उमेदवार पण सासरेबुवांकडून काँग्रेसचा प्रचार! रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा म्हणाल्या “माझे सासरे…”

नेमकं काय घडलं?

पोलीस अधिकारी वंदिता राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महेश चंद्रा याने आपल्या पत्नीला मारण्यासाठी मुकेश सिंग राठोड याला १० लाख रुपयांची सुपारी दिली होती. यातील ५.५० लाख रुपये चंद्रा याने देऊ केले होते. महेश चंद्रा आणि शालू हे पती-पत्नी २०१७ सालापासून वेगळे राहात होते. महेश चंद्रा याने शालूला संपवण्यासाठी अगोदरपासूनच कट रचला होता. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रा याने पत्नी शालूचा अपघात विमा काढला होता.

हेही वाचा >>>> चुनावी हिंदू: राहुल गांधींच्या महाकाल मंदिर भेटीचा भाजपानं जोडला गुजरात निवडणुकीशी संबंध

त्यानंतर महेशने या महिन्याच्या एप्रिल महिन्यात शालूशी संपर्क साधला होता. त्याने शालूशी बोलण्यास सुरुवात केली. त्याने शालू यांना एका मंदिरात ११ वेळा भेट देण्याची विनंती केली. दुचाकीवरून मंदिरात दर्शनासाठी जात असताना शालू यांचा खून करण्यासाठी महेशने हा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी शालू दुचाकीवर मंदिरात जात असताना एका कराने त्यांना धडक दिली. याच अपघाताच्या तपासादरम्यान या कटाचा उलगडा झाला.

हेही वाचा >>>> संतापजनक! ५ विद्यार्थ्यांकडून वर्गमैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, कृत्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर केला शेअर

दरम्यान, महेस चंद्रा आणि शालू यांचे २०१५ साली लग्न झाले होते. त्यांना एक मुलगीदेखील आहे. शालू यांनी महेशविरोधात हुंडा मागितल्याप्रकरणी पोलिसात तक्रार केलेली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan jaipur man tried to kill his wife for 2 crore life insurance prd
First published on: 01-12-2022 at 12:21 IST