सेक्स करणाऱ्या जोडप्याची फेव्हिक्विक टाकून हत्या करण्याऱ्या मांत्रिकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाला "ते माझ्यावर सतत..." | Rajasthan Murder Tantrik Rajasthan Murder Tantrik Reveals reason for killing couple sgy 87reason for killing couple sgy 87 | Loksatta

सेक्स करणाऱ्या जोडप्याची फेव्हिक्विक टाकून हत्या करण्याऱ्या मांत्रिकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाला “माझ्या पापाची…”

मांत्रिकाने जंगलात नेऊन सेक्स करायला सांगितलं, नंतर अंगावर फेव्हिक्विक ओतलं अन्…

सेक्स करणाऱ्या जोडप्याची फेव्हिक्विक टाकून हत्या करण्याऱ्या मांत्रिकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाला “माझ्या पापाची…”
मांत्रिकाने जंगलात नेऊन सेक्स करायला सांगितलं, नंतर अंगावर फेव्हिक्विक ओतलं अन्…

Rajasthan Murder: राजस्थानमध्ये मांत्रिकाने विवाहित तरुण आणि त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मांत्रिकाने सर्वात प्रथम जोडप्याला शारिरीक संबंध स्थापित करण्यास सांगितलं. यानंतर त्याने त्यांच्यावर फेव्हिक्विक टाकलं आणि चाकू, दगडाने गुप्तांगावर वार करत हत्या केली. दरम्यान, ही हत्या करण्यामागचं नेमकं काय कारण आहे याचा खुलासा मांत्रिकाने केला आहे.

आपल्याला आपल्या पापाची शिक्षा मिळेल असं आरोपी मांत्रिकाने म्हटलं आहे. अटक केल्यानंतर मांत्रिकाला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथे त्याला लोकांनी हत्या का केली? अशी विचारणा केली. यावर त्याने दांपत्य आपल्यावर संमोहनासाठी दबाव टाकत होतं, त्यामुळे आपण त्यांची हत्या केल्याचा खुलासा केला. पुढे तो म्हणाला “मी खूप चुकीचं काम केलं आहे. मला माझ्या पापांची सिक्षा मिळेल”.

क्रूरतेची हद्द! जंगलात नेऊन सेक्स करायला सांगितलं, नंतर अंगावर फेव्हिक्विक ओतलं अन्…; घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले

१८ नोव्हेंबरला पोलिसांना सरकारी शिक्षक राहुल आणि त्याची प्रेयसी सोनू कुंवर यांचे मृतदेह सापडले होते. पोलिसांना मृतदेह सापडले तेव्हा त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. ७२ तासांत पोलिसांनी हत्येचा उलगडा केला.

दोघेही होते विवाहित

उदयपूरचे पोलीस अधिक्षक विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही पीडित विवाहित होते. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी ५० ठिकाणचं सीसीटीव्ही तपासलं आणि २०० लोकांची चौकशी केली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनंतर, मांत्रिक भालेक कुमार याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.

राहुल आणि सोनूची मैत्री

पोलिसांच्या माहितीनुसार, मांत्रिक भालेश कुमार गेल्या सात ते आठ वर्षांपासून लोकांना तावीज देऊन त्यांच्या समस्या दूर करत होता. सोनू कुंवर आणि राहुल यांचे कुटुंबीय या मंदिरात येत होते. याचवेळी राहुल आणि सोनू यांच्यात मैत्री झाली होती.

याचमुळे राहुल आपल्या पत्नीसोबत नेहमी भांडत असे. यानंतर राहुलच्या पत्नीने मांत्रिक भालेशकडे मदत मागितली होती. मांत्रिकाने राहुलच्या विवाहबाह्य संबंधांविषयी तिला सर्व काही सांगितलं. तसंच त्याने राहुलची प्रेयसी सोनूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबरच्या रात्री भालेशने राहुल आणि सोनू यांना मदत करण्याचा बहाणा करत बोलावलं. यानंतर तो त्यांना गोगुंदा परिसरातील जंगलात घेऊन गेला.

भालेशने घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोघांनाही शारिरीक संबंध स्थापित करण्यास सांगितलं. यानंतर त्याने फेव्हिक्विकने भरलेली बाटली त्यांच्या अंगावर ओतली. दोघांनाही काही कळण्याच्या आत ते चिकटले होते. त्यांनी वेगळं होण्याचा प्रयत्नही केला. पण यादरम्यान भालेशने चाकू आणि दगडाने त्यांच्यावर हल्ला केला. हत्या केल्यानंतर तो घटनास्थळावरुन फरार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-11-2022 at 14:32 IST
Next Story
Shraddha Murder Case : श्रद्धाच्या ‘त्या’ अर्जावर पोलिसांनी केली २६ दिवस चौकशी, श्रद्धाने अर्ज मागे घेतल्याचा पोलिसांचा दावा