माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ अनेक वर्षे देशाचे नेतृत्वच केले नाही, तर १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या काळातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी इंदिरा गांधींचं कौतुक केलंय. सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या भूमिकेवर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन सेमिनारमधील भाषणात त्यांनी राणी लक्ष्मीबाई आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचंही कौतुक केलं आणि भारताला राष्ट्रीय विकासात महिला शक्तीचा वापर करण्याचा सकारात्मक अनुभव असल्याचं म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी केवळ अनेक वर्षे देशाचे नेतृत्व केले नाही, युद्धाच्या काळातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारताने पाकिस्तानविरुद्ध १९७१ चे युद्ध जिंकले आणि त्यामुळे बांगलादेशचा जन्म झाला, असं त्यांनी म्हटलंय. तर प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपती होत्या तसेच त्या भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर देखील होत्या,” असं सिंह म्हणाले.

सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या सहभागाच्या दृष्टीने सुरुवातीला पुढाकार घेतलेल्या काही देशांपैकी भारत एक आहे. आणि आता महिलांना कायमस्वरूपी कमिशनसाठी स्वीकारले जात आहे. येत्या काळात महिला लष्करी तुकड्या आणि बटालियनचे नेतृत्व करताना दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “भारतीय सैन्य नर्सिंग सेवेमध्ये महिला १०० वर्षांपासून अभिमानाने सेवा देत आहेत. भारतीय लष्कराने १९९२ मध्ये महिला अधिकाऱ्यांना कमिशन देण्यास सुरुवात केली होती. आता लष्कराच्या बहुतेक शाखांमध्ये महिला अधिकाऱ्यांना सामावून घेतले जात आहे,” असं ते म्हणाले.

नौदलात महिलांच्या भूमिकेचा उल्लेख करून सिंह म्हणाले की, “एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये १९९३ मध्ये पासून महिलांच्या सहभागाला सुरुवात झाली. तसेच २०१६ मध्ये महिला अधिकारी सागरी विमानाच्या वैमानिक म्हणून पदवीधर झाल्या होत्या आणि आता त्यांना गेल्या वर्षापासून युद्धनौकावर नियुक्त केले जात आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath singh praises indira gandhi for leading country during times of war hrc
First published on: 14-10-2021 at 17:02 IST