scorecardresearch

काँग्रेसमधील अंतर्गंत वाद पुन्हा चव्हाट्यावर; सचिन पायलटांनी अशोक गेहलोतांना फटकारले, म्हणाले, “एकमेकांवर…”

Sachin Pilot Vs Ashol Gehlot : सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत यांना फटकारलं आहे. एकमेकांचं समर्थन करत नाही तर चिखलफेक करु नका, असे पायलट यांनी म्हटलं.

काँग्रेसमधील अंतर्गंत वाद पुन्हा चव्हाट्यावर; सचिन पायलटांनी अशोक गेहलोतांना फटकारले, म्हणाले, “एकमेकांवर…”
सचिन पायलट अशोक गेहलोत ( संग्रहित फोटो )

राजस्थानमध्ये २०२३ साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गंत वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाही आहे. काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पुन्हा एका मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधला आहे.

सचिन पायलट यांच्या ४५ व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. तेव्हा कार्यकर्त्यांना संबोधित करताना पायलट यांनी म्हटलं की, “अशोक गेहलोत आणि मी एकमेकांचं समर्थन करत नाही आहे. मग, त्यांनी एकमेकांवर चिखलफेक सुद्ध करू नये. आपल्याला एकमेकांना सोबत घेऊन जावं लागणार आहे,” असेही पायलट यांनी सांगितलं.

दरम्यान, २०१८ साली राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यापासून अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. जूलै-ऑगस्ट २०२० मध्ये पायलट यांनी काँग्रेसच्या १८ आमदारांना हाताशी धरून भाजपाच्या मदतीने गेहलोत यांचं सरकार पाडण्यासाठी उघड बंडखोरी केली होती. त्यावेळी बंडखोर आमदारांचा वाद राजस्थान उच्च न्यायालयातही पोहोचला होता. पण, बहुतांश आमदार गेहलोत यांच्याकडे परत गेल्यामुळे पायलट यांचं बंड फसले आणि काँग्रेसमध्ये नामुष्की पत्करुन राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या