नवी दिल्ली : यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची सोमवारी घोषणा करण्यात आली असून मराठी भाषेतील ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मराठी साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेत लेखकाने आपल्या आयुष्यातील अनुभव, सामाजिक वास्तव, संघर्ष आणि वैचारिक प्रवास यांचे प्रभावी चित्रण केले आहे. मराठी भाषेच्या पुरस्कारासाठी नियुक्त परीक्षक मंडळामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले, नागोराव तम्माजी उटकर आणि राजन गवस यांचा समावेश होता. एक लाख रुपयांच्या या पुरस्कारांचे वितरण ३१ मार्च रोजी नवी दिल्लीत होईल.

इतर भाषेतील पुरस्कार विजेते

  • ० असमिया – कड़ि खेलर साधु (उपन्यास) – देवब्रत दास
  • ० बाङ्ला – श्रेष्ठ कबिता (कविता) -प्रसून बंद्योपाध्याय
  • ० बोडो दोंनै लामाः मोनसे गाथोन (उपन्यास) – सहायसुलि ब्रह्म
  • ० डोगरी -‘ठाकुर’ सतसई (कविता, दोहे) – खजूर सिंह ‘ठाकुर’
  • ० इंग्रजी – क्रिमसन स्प्रिंग (उपन्यास) – नवतेज सरना
  • ० गुजराती – भट्टखडकी (कविता) – योगेश वैद्य
  • ० हिंदी – जीते जी इलाहाबाद (संस्मरण) – ममता कालिया
  • ० कन्नड – दडा सेरिसु तंदे (कहानी) – अमरेश नुगडोणी
  • ० कश्मिरी – नजदावनेकी पॉट अलाव (कविता) – अली शैदा
  • ० कोंकणी – कोंकणी काव्यें: रुपां आनी रूपकां (आलोचनात्मक निबंध) – हेनरी मेंडोनका (एच. एम. पेरनाळ)
  • ० मैथिली – धात्री पात सन गाम (संस्मरण) – महेन्द्र
  • ० मल्याळम – मायामानुष्यर (उपन्यास) – एन. प्रभाकरन
  • ० मणिपुरी – कंगलमद्रीब इफुत (कहानी) – हाओबम नलिनि
  • ० नेपाळी – नेपाळी पारम्परिक संस्कृति र सभ्यताको ढुकुटी (निबंध) -प्रकाश भट्टराई
  • ० ओड़िआ – पदपुराण (कविता) – गिरिजाकुमार बलियारसिंह
  • ० पंजाबी – सेफ्टी किट (कहानी) – जिंदर
  • ० राजस्थानी – भरखमा (कहानी) – जितेंद्र कुमार सोनी
  • ० संस्कृत – प्रस्थानचतुष्टये ब्रह्मघोषः (कविता) – महामहोपाध्याय साधु भद्रेशदास
  • ० संताली – मिड बिर्ना चेनने साओन इनाग सागई (कहानी) – सुमित्रा सोरेन
  • ० सिंधी – वाघू (कहानी) – भगवान अटलानी
  • ० तमिळ – तमिळ सिरुकथैयिन थडंगल (साहित्यिक आलोचना) – सा. तमिळसेलवन
  • ० तेलुगु – अनिमेष (कविता) – नंदिनी सिद्धरेड्डी
  • ० उर्दू – सफ़र जारी है (कविता) – प्रितपाल सिंह बेताब