Rajya Sabha Election 2026 BJP Candidate List: आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने सहा राज्यांमधून नऊ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे नाव आहे, नबीन यांना बिहारमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय शिवेश कुमार यांनाही भाजपाने बिहारमधून राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

सहा राज्य, नऊ उमेदवार

बिहार –  नितीन नबीन आणि शिवेश कुमार 

आसाम – तेराश गोवाला आणि जोगेन मोहन

छत्तीसगड – लक्ष्मी वर्मा

हरियाणा – संजय भाटिया

ओडिशा – मनमोहन सामल आणि सुजित कुमावार

पश्चिम बंगाल – राहुल सिन्हा

संघटनात्मक प्रभाव असलेल्या नेत्यांना प्राधान्य

१० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. ५ मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. राज्यसभेसाठी भाजपाने तिकिटे वाटप करताना मजबूत संघटनात्मक प्रभाव असलेल्या नेत्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

बिहारमध्ये राज्यसभेच्या पाच जागा

बिहारमधील पाच राज्यसभा सदस्यांची मुदत एप्रिलमध्ये समाप्त होत आहे. यात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर, प्रेमचंद्र गुप्ता, अमरेंद्र धारी सिंह आणि उपेंद्र कुशवाह यांचा समावेश आहे. हरिवंश नारायण सिंह आणि रामनाथ ठाकूर हे जनता दल (युनायटेड) चे नेते आहेत. तर, प्रेमचंद्र गुप्ता आणि अमरेंद्र धारी सिंह हे आरजेडीचे प्रतिनिधित्व करतात आणि उपेंद्र कुशवाह हे राष्ट्रीय लोक मोर्चाचे (RLM) नेते आहेत.