भारताचे ‘वॉरन बफे’ अशी ओळख असलेले आणि भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे ‘किंग’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांना मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – टाटा ते टायटन ‘या’ मोठ्या शेयर्समध्ये आहे राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक

शेअर बाजारामध्ये पाच हजारांच्या गुंतवणुकीपासून सुरू केलेला प्रवास कोट्यावधींच्या घरात पोहोचवण्याची किमया साधणाऱ्या झुनझुनवाला यांचा प्रवास थक्क करणारा आहे. दरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे.

राकेश झुनझुनवाला हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे ते व्हिलचेअरवरच असायचे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कुटुंबियांसह करजा रे या गाण्यावर डान्स करताना एका व्हिडीओतून दिसून येत आहेत. त्यांच्या निधानानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राकेश झुनझुनवाला यांचा जीवनप्रवास

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जून १९६० साली एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडिल आयकर अधिकारी होते. १९८६ साली कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्याकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स केवळ १५० अंकांवर होता. शेअर बाजारामध्ये त्यांनी पाच हजारांपासून सुरू केलेली गुंतवणूक आज कोट्यावधींच्या घरात आहे. राकेश झुनझुनवाला यांनी सर्वात आधी ‘टाटा टी’ संदर्भात व्यक्त केलेला अंदाज बरोबर ठरला आणि १९८६ साली त्यांना पाच लाखांचा नफा झाला. त्यांनी ४३ रुपयांना ‘टाटा टी’चे पाच हजार शेअर्स विकत घेतले होते. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये या शेअर्सची किंमत १४३ रुपयांपर्यंत वाढली. त्यामुळेच त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तिपटीहून अधिक पैसा त्यांना या शेअरमधून मिळाला.

हेही वाचा – विनायक मेटे यांचं निधन हे महाराष्ट्राचं नुकसान; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली हळहळ

शेअर बाजारामध्ये ‘बिग बुल’ समजल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवालांनी हर्षद मेहताच्या कालावधीमध्ये मोठा नफा कमावला होता. त्यानंतर १९९२ साली उघडकीस आलेल्या घोटाळ्यामध्ये त्यांना मोठा फटका बसला होता. एका मुलाखतीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी आपण शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून भरपूर पैसा कमवल्याचे कबूल केले होते.

हेही वाचा – बीडमध्ये कार आणि टेम्पोचा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

१९८७ मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी रेखा झुनझुनवाला यांच्याशी लग्न केले. अंधेरीत राहणाऱ्या रेखा या स्टॉक मार्केटमधील गुंतवणूकदार होत्या. २००३ साली झुनझुनवाला यांनी त्यांची स्वत:ची स्टॉक ट्रेडींग फर्म ‘रेअर एन्टरप्रायझेस’ची स्थापना केली. हे नाव त्यांनी पत्नीच्या आणि स्वत:च्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांपासून ठेवले होते.

More Stories onमुंबईMumbai
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakesh jhunjhunwala dance on kajrare song video viral on social media spb
First published on: 14-08-2022 at 17:26 IST