scorecardresearch

राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी ; BKU ने मागितली Y श्रेणीची सुरक्षा

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे

(संग्रहीत छायाचित्र)

शेतकरी नेते राकेश टिकैत यांना जीवे मारण्याच्या धमकी मिळाली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. त्याचवेळी, भारतीय किसान युनियनने त्यांचे नेते टिकैत यांना Y श्रेणीची सुरक्षा दिली जावी अशी मागणी केली आहे.

राकेश टिकैत यांनी आरोप केला आहे की, शेतकरी आंदोलनानंतर मला आणि माझ्या कुटुंबियांच्या मोबाईलवर धमकीचे फोन येत होते, मात्र आता उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या विजयानंतर जीवे मारण्याची धमकमी दिली जात आहे आणि शिवीगाळ केली जात आहे. मुझफ्फरनगर पोलिसांनी या धमकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा द्यावी, अशी मागणी भारतीय किसान संघाने केली आहे. राकेश टिकैत यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे भारतीय किसान युनियनने म्हटले आहे.

या प्रकरणी मुझफ्फरनगर पोलिसांनी ट्विट केले की, या संदर्भात सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वस्तुस्थितीच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakesh tikait receives death threats bku seeks y class protection msr

ताज्या बातम्या