Maing Of Ram Mandir in Ayodhya : उत्तर प्रदेशमधील आयोध्या येथे भव्य राम मंदिर उभारण्यात आले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की या मंदिराच्या उभारणीत चार हजार कामगार आणि कारागीरांनी सलग पाच वर्ष रात्रंदिवस केलेली मेहनत आहे. या अखंड मेहनतीच्या जोरावर अयोध्या येथील राम मंदिर उभे राहिले आहे. इतकेच नाही तर या प्रयत्नांत त्यांना सीबीआरआय रूडकी, आयआयटी मद्रास, दिल्ली, मुंबई आणि गुवाहटी, तसेच इंडियन इंस्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स येथील अभियंत्यांचे पाठबळ मिळाले. या सर्वांच्या मेहनतीतून काळाच्या कसोटीवर टिकणारे आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सक्षम असे राम मंदिर उभारण्यात आले आहे.
श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, मुख्य मंदिराचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे, सध्या लँडस्केपिंगचे काम सुरू आहे आणि बाउंड्री वॉल आणि सभागृहाचे काम हे २०२६ च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यांनी असेही सांगितले की, सुरुवातीला दान म्हणून ३००० कोटी रुपये मिळाले होते, आणि जवळपास १८०० कोटी रुपये
मंदिरात काय खास आहे?

अयोध्येतील मंदिर हे तीन मजली असून त्याची उंची ही १६१ फूट, रुंदी २३५ फूट आणि लांबी ३६० फूट इतकी आहे. विशेष बाब म्हणजे मंदिराच्या उभारणीत कालांतराने गंजणारे आणि मंदिराचे आयुष्य कमी करणारे पोलाद किंवा लोखंड वापण्यात आलेले नाही, तर उभारणीसाठी राजस्थान येथून आणण्यात आलेले बंन्सी पहाडपूर सँडस्टोन वापरण्यात आला आहे. माकडे आणि पक्षांना मंदिरात जाता येऊ नये यासाठी लावलेल्या जाळ्या देखील टायटॅनियम पासून बनवलेल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे टायटॅनियम मिश्र धातू निगम लिमिटेड या हैदराबाद येथील कंपनीतून आणण्यात आले आहे. ही एक पब्लिक सेक्टर इंटरप्रायजेस आहे, ज्यांनी ३१ जाळ्या तयार केल्या.
पहिल्या मजल्यावर देवी-देवतांच्या मूर्ती रेखाटण्यात आलेले १६० खांब आहेत. येथे गर्भ गृह तयार करण्यात आले आहे, जेथे राम लल्ला यांची कृष्ण शिला किंवा म्हैसूर ब्लॅक ग्रेनाइटमध्ये साकारण्यात आलेली मूर्ती बसवण्यात आलेली आहे.मंदिराला एकूण ४७ दरवाजे आहेत, ज्यापैकी १४ दरवाजे हे ग्राउंड फ्लोअरवरती आहेत आणि त्यांना सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे.

पहिल्या मजल्यावर राम दरबार आहे. यामध्ये प्रभू राम यांचे मूर्ती, त्याबरोबर सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती देखील आहेत. या सर्व मूर्ती राजस्थान येथील व्हाईट मकराना मार्बलमध्ये घडवलेल्या आहेत. या मजल्यावर १३२ कॉलम्स आहेत ज्यावर कोरीव काम केलेले आहे.
हे मंदिर नागरा स्थापत्यशैलीत बांधण्यात आले आहे आणि मुख्य कॉम्प्लेक्समध्ये गर्भ गृह सोडून पाच मंडप (हॉल) आहेत. हे नृत्य, रंग, गुढ, किर्तन आणि प्रार्थना मंडप हे वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि धार्मिक विधीसाठी बांधण्यात आलेले आहेत. तळ मजल्यावर सहा मंदिरे आहेत, जी वेगवेगळ्या देवतांची आहेत- ज्यामध्ये सूर्य, शिव, भागवती, गणेश, हनुमान आणि माता अन्नपूर्णा यांच्या मंदिरांचा समावेश आहे. तसेच येथे ट्रस्टचे कार्यालय देखील आहे. वरच्या मजल्यावर परिक्रमा मार्ग आहे.याशिवाय सप्तऋषींची सात मंदिरे देखील आहेत, ज्यामध्ये महाऋषी वशिष्ठ, विश्वमित्र, वाल्मिकी, अगस्त्य, निषाध राज, अहल्या आणि माता शबरी यांचा समावेश आहे.

काय बांधकाम बाकी आहे?
मुख्य मंदिराचे संकुल हे २.७ एकरमध्ये व्यापलेले आहे, जे पूर्ण झाले आहे. एकूण परिसर हा ७० एकरहून जास्त आहे, ज्यापैकी २० एकर हा बांधकामासाठी वापरण्यात आला आहे, तर ५० एकर हा रिकामा आहे आणि जवळपास ३० एकर जागा ही ग्रीन बेल्टसाठी राखून ठेवण्यात आलेली आहे.
राहिलेले काम हे लँडस्केपिंगचा एक भाग, ४ किलोमीटर लांबीची बाहेरील सीमेची भिंत आणि एक सभागृह इतके आहे. “मुख्य मंदिराचे बांधकाम आणि त्याचे सर्व काम पूर्ण झाले आहे. जे बाकी आहे ते म्हणजे परिसराला झाकणाऱ्या काटेरी तारांच्या जागी सिमेंटची सीमा भिंत बांधणे, ज्याचे कंत्राट यूपी राजकीय निर्माण निगमला देण्यात आले आहे. या सीमा भिंतीला लागूनच सभागृह देखील उभारले जाईल. हे काम देखील २०२६ पर्यंत पूर्ण होईल असे आम्हाला अपेक्षित आहे,” असे मिश्रा म्हणाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडस्केपिंगमध्ये पंचवटी विकसित करण्याचाही समावेश आहे, हा जंगलाचा भाग असेल जो माकडे, पक्षी, खारी आणि इतर प्राण्यांसाठी असेल
मिश्रा यांनी सांगितले की, एक पाच वर्षांचे कंत्राट जीएमआर ग्रूपला दिण्यात आले आहे, ज्यांनी सीएसआर म्हणून ते मोफत करणार असल्याचे सांगितले आहे.तसेच त्यांनी सांगितले की, सुरू राहणारी प्रक्रिया आहे आणि येथे हंगामी झाडे लावली जातील.
