पहिल्याच पावसात राम मंदिराच्या गाभाऱ्याला गळती लागल्याचा दावा मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराज यांनी केला आहे. पहिल्या पावसानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचल्याचे ते म्हणाले. याशिवाय त्यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याच्या कालावधीबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.

हेही वाचा – २२ हत्या करणारा किस्सू तिवारी साधूच्या वेशात रामलल्लाच्या दर्शनाला गेला, पोलिसांनी केली अटक, नेमकं घडलं काय?

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान
Nitishkumar
“…म्हणून नितीश कुमारांनी पंतप्रधान मोदींकडे महत्त्वाची खाती मागितली नाही”; प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण!
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक

नेमकं काय म्हणाले सत्येंद्रदास महाराज?

सत्येंद्र दास महाराज यांनी नुकताच एएनआय वृत्तसंस्थेला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राम मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचत असल्याचे सांगितले. जिथे प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान आहे, तिथे पहिल्याच पावसात गळती सुरु झाली आहे. पहिल्या पावसामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचले होते. त्यामुळे बांधकामावेळी नेमकी काय चूक झाली. याची माहिती घेणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. तसेच यावर उपाययोजना न केल्यास मंदिरात पूजा करणे कठीण होईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेला न जाणं काँग्रेसची चूक होती? प्रियांका गांधी म्हणाल्या, “भाजपाने आम्हाला…”

पुढे बोलताना त्यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याच्या कालावधीबाबतही प्रतिक्रिया दिली. मंदिराचं बांधकाम अद्याप सुरू आहे. या मंदिरात आणखी काही मुर्ती स्थापन करण्यात येणार आहे. २०२५ पर्यंत हे बांधकाम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, आता २०२४ सुरू आहे. २०२५ ला केवळ एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे एका वर्षात हे बांधकाम पूर्ण होणं अशक्य आहे, असे ते म्हणाले.