Ram Nath Kovind on One Nation One Election : देशात ‘एक देश, एक निवडणूक’ हे धोरण राबवण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर महिन्यात स्वीकारला होता. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली असून येत्या काही दिवसात हे विधेयक संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याची संकल्पना ही भारताच्या निवडणुकींच्या इतिहासात रुजलेली आहे असे म्हटले आहे. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

कोविंद यांनी मतदार त्यांचे मत हे प्रशासनाला लक्षात घेऊन करत असतात, सरकार निवडणुकींमध्ये गुंतलेले राहिल या अपेक्षेने नाही, असा युक्तीवाद देखील ‘एक देश, एक निवडणूक’चे महत्व पटवून देताना केला.

Aditi Tatkare OnLadki Bahin Yojana January Installment Date in Marathi
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Ladki Bahin Yojana Next Installment Date
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती
अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?

सतत होणाऱ्या निवडणुकांचा प्रशासनावर काय परिणाम होते हे दाखवून देण्यासाठी कोविंद यांनी राजस्थान येथील उदाहरण दिले. “२०२३ च्या अखेरपर्यंत राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक झाली आणि नवीन सरकारने कार्यभार स्वीकारला. नोकरशाहीमध्ये बदल करण्यात आले आणि लोक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी सरकारकडे जाऊ लागले. पण सत्तेत आलेल्यांचे उत्तर होते की लोकसभा निवडणूक पार पडेपर्यंत वाट पाहा. हे चक्र जुलै २०२४ मध्ये संपले. २०२६ च्या सुरुवातीला पंचायत निवडणूक सुरू होईल. त्यानंतर सर्व लक्ष हे पुढील विधानसभेची निवडणूक २०२८ वर केंद्रीत केले जाईल. या प्रक्रियेत निवडणुकीत अनेक वर्ष वाया घालवले जातात”, असे मत कोविंद यांनी व्यक्त केले.

कोविंद म्हणाले की एकत्र निवडणुकीची संकल्पना ही १९५२ आणि १९६७ साली घेण्यात आलेल्या निवडणुकींपासूनची आहे. “तेव्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकत्र झाल्या होत्या. पुढे अडचणी आल्या आणि प्रक्रिया बदलली”, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कोविंद म्हणाले की एक देश, एक निवडणूक या संकल्पनेबद्दल सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये अने गैरसमज दिसून येतात. त्यांनी सांगितलं की, “आज अस्तित्वात असलेले संविधान अनेक निवडणुकींना परवानगी देते. पण मी ज्यांच्याशी बोललो अशा अनेकांनी लक्षात आणून दिलं आहे की प्रत्येक पाच वर्षांच्या काळात चार वर्षे ही निवडणूक प्रक्रियेत घालवली जातात”.

हेही वाचा >> काँग्रेसला संविधान खिशात टाकण्याचीच सवय, संविधानावरील चर्चेत राजनाथ सिंह यांचा थेट प्रहार

निवडणुकींचा खर्च किती कमी होईल?

रामनाथ कोविंद यांनी सांगितले की, त्यांनी ज्या समितीचे नेतृत्व केले त्यामध्ये अर्थतज्ञ एन. के सिंग यांचादेखील समावेश होता. त्यांनी भारतील निवडणुकींसाठी येणार्‍या खर्चाच्या अभ्यासासाठी एक गट स्थापन केला होता. सध्या निवडणुकींसाठी ५ ते ५.५ लाख कोटी रूपयांचा खर्च येतो.जर निवडणुका एकत्र घेण्यात आल्या तर हा खर्च ५०,००० कोटी रुपये इतका कमी केला जाऊ शकतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

“या बचतीमुळे जीडीपी वाढीला चालना मिळू शकते, महागाई कमी होईल आणि औद्योगिक वाढीसाठी थेट निधी मिळू शकेल. एकंदरीत भारताचा जीडीपी अंदाजे १ ते १.५ टक्क्याने वाढल्याचे पाहायला मिळेल”, असेही कोविंद म्हणाले.

Story img Loader