अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर प्रभू रामाची वाट पाहाणाऱ्या राम भक्तांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. हे रामाचे भक्त आता डिसेंबर २०२३ पासून प्रभू रामाचे दर्शन घेऊ शकणार आहेत. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची पायाभरणी केली होती, तेव्हापासून मंदिराला मूर्त स्वरूप देण्यास सुरुवात झाली.

मंदिराच्या बांधकामासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून देणग्या गोळा केल्या जात होत्या. त्याचबरोबर राम मंदिर निर्माण समिती बांधकामासाठी काम करत आहे. जुलैच्या झालेल्या राम मंदिर बांधकाम समितीमध्ये यावर चर्चा झाली. २०२३ मध्ये म्हणजे नियोजित वेळेच्या एक वर्ष आधी, भव्य राम मंदिरात रामाचे दर्शन घेता येणार आहे असे सांगण्यात आले होते.

बैठकीत राम मंदिराचा परिसर पर्यावरणपूरक असेल असा निर्णय घेण्यात आला. येथे त्रेतायुगाच्या सुंदर दृश्यांसह, भक्तांसाठी आधुनिक सुविधांवर पूर्ण लक्ष असेल. संपूर्ण परिसर २०२५ च्या अखेरीस विकसित केला जाईल.