काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर हे त्यांच्या इंग्रजीमुळे ओळखले जातात. त्यांचे लिहिलेले शब्द वाचून कधी कधी चांगल्या अनुवादकांचा घाम फुटतो. पण गुरुवारी थरूर यांच्या ट्विटरवर इंग्रजीतील अनेक चुका पकडल्या गेल्या. त्यांच्या या चुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पकडल्या आहेत. रामदास आठवलेही त्यांच्या सभागृहातील भाषणांमुळे आणि कवितांमुळे अनेकदा चर्चेत असतात.

गुरुवारी काँग्रेस खासदार शशी थरूर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यात मजेदार ‘ट्विट वॉर’ पाहायला मिळाले. एकीकडे थरूर यांनी लोकसभेचा फोटो पोस्ट करताना आठवले यांचा उल्लेख केला, तर काही वेळाने केंद्रीय मंत्र्यांनीही थरूर यांना योग्य इंग्रजीत लिहिण्याचा सल्ला दिला आहे.

vilas lande letter, vilas lande, Sharad Pawar,
पिंपरी-चिंचवड: शरद पवारांवरील टीकेनंतर अजित पवारांच्या माजी आमदाराचे भाजपा श्रेष्ठीला पत्र
Sunil Shelke, Supriya Sule, Baramati,
“आम्ही कधी बारामती बारामती म्हटले का?”, आमदार सुनील शेळके आणि सुप्रिया सुळे यांच्यात वाद
Smriti Singh | स्मृती सिंग
“स्मृती सिंग यांनी प्रेमाच्या नावाखाली…”, शहीद अंशुमन सिंग यांच्या वडिलांचा गंभीर आरोप!
Mukesh Ambani Strict Diet Plan
मुकेश अंबानी यांचा डाएट प्लॅन नीता अंबानींनी केला शेअर; पार्टी, मेजवान्यांमध्येही कठोरपणे पाळतात ‘हा’ नियम
IAS Pooja Khedkar Mother Manorama Khedkar Gun Video
Manorama Khedkar Video : “…म्हणून मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल काढले”, पूजा खेडकरंच्या वडिलांनी सांगितले धक्कादायक कारण
Akshata Murty trolled over her Rs 42,000 dress
अक्षता मूर्ती ४२ हजारांचा ड्रेस परिधान केल्याने ट्रोल, नेटकरी म्हणाले, “ऋषी सुनक निरोपाचं भाषण देताना…”
sharad pawar on nilesh lanke oath in english,
इंग्रजीतून शपथ घेत निलेश लंकेंचं सुजय विखेंना प्रत्युत्तर; शरद पवारांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले…
Sanskrit Oath Bansuri Swaraj
“जशी आई, तशी लेक”, बांसुरी स्वराज यांनी संस्कृतमधून शपथ घेताच नेटिझन्सकडून सुषमा स्वराज यांचा जुना व्हिडीओ व्हायरल

स्पेलिंगमध्ये चूक असल्याचे सांगत रामदास आठवले यांनी शशी थरूर यांच्या ट्विटवरुन टीका केली. थरूर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या मागे रामदास आठवले बसलेले दिसत आहेत. “अर्थसंकल्पावर सुमारे दोन तास चर्चा झाली. मंत्री रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव सारे काही सांगत आहेत. अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्पाबाबत अर्थमंत्र्यांच्या दाव्यांवर आघाडीचाही विश्वास बसत नाही,” असे थरूर यांनी म्हटले.

या ट्विटला केंद्रीय मंत्री आठवले यांनी उत्तर दिले आहे. “प्रिय शशी थरूर जी, असे म्हणतात की अनावश्यक दावे आणि विधाने करताना चुका होणारच. इथे ‘Bydget’ नाही तर BUDGET होईल आणि rely ऐवजी ‘reply’ होईल! पण आम्ही समजू शकतो!” असे आठवले यांनी म्हटले आहे. रामदास आठवलेंची ही व्यंग्यात्मक शैली सोशल मीडियावर जोरदार व्हायरल आहे. काही दिवसांपूर्वी आठवले यांनी सभागृहात पंतप्रधान मोदींच्या स्तुतीसाठी एक कविता वाचली होती. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचेही त्यांनी कौतुक केले होते.

रामदास आठवलेंच्या ट्विटनंतर थरूर यांनीही उत्तरात आपली चूक मान्य केली होती. टायपिंगमधील चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. “बेफिकीरपणे टायपिंग करणे हे खराब इंग्रजीपेक्षा मोठे पाप आहे..!” असे थरुर यांनी म्हटले.