कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणी दरम्यान सुरक्षेची काळजी हरियाणा सराकारने घेतली आहे. सुनावणी दरम्यान कोर्टच्या कडेला तीन किलोमीटर पर्यंत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सुरक्षेचा घेरामध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्तीच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. शहरातील काही रस्त्यांची दिशा बदलण्यात आली आहे. रामपालच्या समर्थकांना रोखण्यासाठी हिस्सार शहाराच्या सिमेवर ४८ पोलिस नाके लगावण्यात आले आहे.
सुनावणी दरम्यान २० हजार समर्थक कोर्ट परिसर, तुरूंग, टाऊन पार्क आणि रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. समर्थकांनी हिसंक वळण घेऊ नये त्यासाठी प्रशासनाने आधीच सर्व उपाययोजना केली आहे. दोन हजार पोलिसांचा फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे. पोलिसासह आरपीएफच्या पाच तुकड्यांनाही बोलवण्यात आले आहे.
कोण हा रामपाल?
१९५१मध्ये सोनपत येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला रामपाल हरयाणा सरकारच्या पाटबंधारे खात्यात कनिष्ठ अभियंता होता. सेवेतील कुचराईवरून त्याला काढले गेल्याचे बोलले जाते, १८ वर्षांच्या सेवेनंतर ते स्वत:हून निवृत्त झाले, असे त्यांचे समर्थक सांगतात. सेवेत असतानाच १९९९मध्ये त्याने आपला पहिला आश्रम काढला. नंतर आपण संत कबीरांचा अवतार आहोत, असे त्याने जाहीर केले व हरयाणात अनेक भागांत आश्रम काढले. २००६ पासून देशद्रोह आणि हत्येचा खटला सुरु झाला. त्यानंतर चर्चेत आला. हत्येप्रकरणी २०१४ मध्ये स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू रामपालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
काय आहे प्रकरण आणि कशी केली अटक?
२००६ मध्ये रामपाल यांनी ‘सत्यार्थ प्रकाश’ या धार्मिक पुस्तकातील काही भागावर आक्षेप घेतला होता. यामुळे रामपाल आणि आर्य समाजाच्या लोकांमध्ये वाद निर्माण झाला होता. यावेळी लोकांनी रोहतकमधील रामपाल यांचा आश्रम बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रामपाल यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर गोळीबारही केला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर १६० जण जखमी झाले होते. यानंतर न्यायालयाने रामपाल यांना ४३ वेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही रामपाल न्यायालयात हजेरी लावत नव्हते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने पोलिस रामपाल यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या रोहतक येथील आश्रमात पोहोचले होते. मात्र, याठिकाणी रामपाल यांचे १५ हजार समर्थक आधीच हजर होते. यावेळी त्यांनी पोलिसांवरच दगडफेक, गोळीबार, पेट्रोल बॉम्ब आणि अॅसिड बॉम्बचा हल्ला चढवला होता. सतलोक आश्रमात जेव्हा पोलिस त्यांना पकडायला आले तेव्हा रामपाल समर्थकांकडून त्याठिकाणी पोलिसांवर हल्ला झाला होता. त्यानंतर या आश्रमातून ज्या लोकांना बाहेर काढण्यात आले होते.