युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. श्रीलंकेच्या २२५ सदस्यांच्या संसदेत रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे केवळ एकच जागा आहे. तरीही ते पंतप्रधान बनले आहेत.

श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेत सरकारविरोधात असंतोष पसरला असून देशात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहेत. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. देशाची आर्थिक परिस्थिती कोलमडल्यानंतर महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देशात हिंसाचार अधिक तीव्र झाला आहे. राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान पदाची जबाबदारी आता रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे आली आहे.

Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
muzaffar beg kashmir loksabha
काश्मीरमध्ये लोकसभेची पहिली जागा जिंकण्यासाठी भाजपा सज्ज; पहाडी नेते मुझफ्फर बेग यांना पक्षाचा पाठिंबा मिळेल का?
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका
Narendra Modi Sharad Pawar
“यूपीए सरकारचे कृषीमंत्री दिल्लीत पॅकेज घोषित करायचे, पण ते पैसे…”, पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

विक्रमसिंघे यांची या आगोदर चार वेळा श्रीलंकेच्या पंतप्रधान पदी निवड

या आधीही रानिल विक्रमसिंघे यांनी चार वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून कारभार पाहिला होता. ऑक्टोबर २०१८ साली तत्कालीन राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांच्यामुळे विक्रमसिघे यांना पायउतार व्हावे लागले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना, विरोधी पक्ष जन बालावेगाया आणि इतर लहान पक्षांनी रानिल विक्रमसिंघे यांना पाठिंबा दिला आहे.

श्रीलंकेत सध्याची परिस्थिती

श्रीलंकेचे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली आहे. माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांनी राजीनामा दिल्यानंतर देशातील परिस्थिती आणखी चिघळली आहे. सरकारविरोधी निदर्शकांनी राजपक्षे यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री सनथ निशांत यांच्या घराला आग लावली. एवढचं नाही तर सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी कोलंबोमध्ये सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्यांना मारहाण केल्याची देखील घटना घडली आहे. या हिंसाचारात अत्तापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार भडकवल्याप्रकरणी महिंदा राजपक्षे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.