तरुणीवर सामूहिक अत्याचार; व्हायरल व्हिडीओवरून एका महिलेसह पाच बांगलादेशींना अटक

केंद्रीय मंत्र्यांनीही केलं होतं राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना मदतीचं आवाहन; बंगळुरूत ठोकल्या बेड्या

Rape
आरोपीने या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. (संग्रहित छायाचित्र)

एका तरुणीवर बलात्कार करून व्हिडीओ बनवणाऱ्यांना बंगळुरूत पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध सुरू केला होता. या प्रकरणात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही ट्विट करत आरोपींना पकडण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरुद्ध बंगळुरूतील राममूर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका तरुणीवर सामूहित अत्याचाराचा आणि अनैसर्गिक कृत्य करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ आसाम पोलिसांच्या निदर्शनास आला आहे. त्यानंतर पोलिसांनी व्हिडीओतील आरोपींची दृश्य सोशल मीडियावर शेअर करत, या घटनेबद्दल कुणालाही काही माहिती असल्याचं माहिती देण्याचं आवाहन केलं होतं.

आसाम पोलिसांचं हे ट्विट केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही रिट्विट केलं. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना त्यांनी आवाहन केलं होतं. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असं रिजिजू म्हटले होते. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरूच होता. बंगळुरू पोलिसांना आरोपींबद्दलची माहिती मिळाली. पोलिसांनी व्हिडीओत दिसणाऱ्या आरोपींसह एका महिलेला अटक केली.

“व्हिडीओतील दृश्य आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर दोन महिलांसह सहा जणांविरुद्ध बलात्कार आणि हल्ला केल्याचा गुन्हा राममूर्ती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा शोध घेण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आलं असून, तपासात पीडितेची मदत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असं बंगळुरूचे पोली आयुक्त कमल पंत यांनी ट्विट करून सांगितलं. “हे सर्व एकाच ग्रुपमधील असून, ते बांगलादेशी आहेत. या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिताही बांगलादेशी आहे. तिला भारतात विक्रीसाठी आणण्यात आलं होतं. पैशांच्या वादावरून त्यांनी तिचा छळ केला आणि क्रूर अत्याचार केले. या प्रकरणाचा तपास केला जात आहे,” असंही पंत यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rape and video shoot of sexual assault five arrested for brutal brutalised young woman bmh

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या