Rape On Girl : पोलिसांनी सहा जणांना एका महाविद्यालयीन मुलीवर बलात्कार ( Rape On Girl ) केल्याप्रकरणी अटक केली आहे. या सहा जणांमध्ये एकजण अल्पवयीन आहे. तिला कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करण्यात येत होतं. हे व्हिडीओ आक्षेपार्ह होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ज्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे त्यातला एक या मुलीचा बॉयफ्रेंड आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
कुठे घडली घटना?
ओडिशातल्या कटक या ठिकाणी ही घटना घडली. कटकचे पोलीस उपायुक्त जगमोहन मीना यांनी सांगितलं की कटक पोलीस ठाण्यात ४ नोव्हेंबरला तक्रार दाखल करण्यात आली. या मुलीला ब्लॅकमेल ( Rape On Girl ) केलं जात होतं. तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ सहा जणांकडे होते. तिचं शोषण करण्यात आलं. ती एका कॅफेत गेली होती, त्यावेळी कॅफे मालकाने तिचे व्हिडीओ आणि फोटो काढले. अशी बाबही मुलीने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांनी काय सांगितलं आहे?
पोलिसांनी केलेल्या FIR नुसार आरोपींना या मुलीचा कॅफेतला एक व्हिडीओ आणि इतर काही आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले होते. त्यानंतर तिला ते व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार कऱण्यात आला. सुरुवातीला दोघांनी तिचं शोषण केलं, तिच्यावर बलात्कार केला. या दोन्ही घटना दोन वेगवेगळ्या दिवशी घडल्या. त्यानंतर आणखी दोघांनी या मुलीवर बलात्कार केला, तिचं शोषण ( Rape On Girl ) केलं. अशी माहिती जगमोहन मीना यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
सहा जणांना अटक, मोबाईल जप्त
या प्रकरणात ( Rape On Girl ) पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यांचे मोबाइलही पोलिसांनी जप्त केले आहेत. हे मोबाइल राज्याच्या फॉरेन्सिक विभागाकडे पाठवले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. तसंच तो व्हिडीओ आणखी पसरणार नाही ही खबरदारी आम्ही घेतली आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
हे पण वाचा- मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजमध्ये शिकणारी ही मुलगी कटक येथील एका कॅफेत गेली होती. तिच्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस होता आणि दसरा उत्सवही होता त्यामुळे ती कॅफेत गेली होती. यावेळी या कॅफे मालकाने सदर मुलीचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ त्याच्या मोबाइलमध्ये काढले. तिचे इंटिमेट व्हिडीओ दाखवून कॅफेचा मॅनेजर तिला ब्लॅकमेल करु लागला. त्यानंतर त्याने अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केली.
काँग्रेस आमदार सोफिया फिरदोस यांनी काय म्हटलं आहे?
या प्रकरणात काँग्रेसच्या आमदार सोफिया फिरदोस यांनीही लक्ष घातलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार नोंदवून घ्यायला उशीर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी ओडिशाच्या पोलीस महासंचालकांचीही भेट घेतली. पीडित मुलीला दोन पोलीस ठाण्यांमध्ये का जावं लागलं आणि तिची तक्रार नोंदवून घ्यायला उशीर का झाला हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.