दिल्लीत धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तिघे अटकेत

मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास संशयावरुन एका कारचा पाठलाग केला. कार रोखून तपासणी करताना आतमध्ये एका मुलीसह तिघे युवक दिसले.

प्रातिनिधिक छायाचित्र

रोहिणी येथील नरेला परिसरात मंगळवारी रात्री उशिरा धावत्या कारमध्ये एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून रवी कुमार, मोहित आणि विनोद अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास संशयावरुन एका कारचा पाठलाग केला. कार रोखून तपासणी करताना आतमध्ये एका मुलीसह तिघे युवक दिसले. कारमधील १२ वर्षीय मुलीने या तीन मुलांनी बलात्कार केल्याचा आरोप केला. आरोपी आणि मुले एकाच परिसरात राहणारी आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरुन दोघांना अटक केली. एक जण तेथून पसार होण्यात यशस्वी झाला होता. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rape on minor girl in running car in delhi 3 arrested

ताज्या बातम्या