ब्रिटनमधून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. ब्रिटिश खासदार रुपर्ट लॉ यांनी ब्रिटनमधल्या सर्वात भयंकर पाकिस्तान ग्रूमिंग गँग्ज स्कँडलबाबत अनेक आरोप केले आहे. रुपर्ट लो यांनी त्यांच्या स्वतंत्र तपासाचा अहवाल वाचला. त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे निष्पाप आणि निरागस मुलींवर अत्याचार करण्यात आले, तसंच पोलीस प्रशासन डोळेझाक करुन बसलं होतं असाही दावा त्यांनी केला.
पाक ग्रूमिंग गँग्स स्कँडल बाबत ब्रिटिश खासदार रुपर्ट लो यांनी काय सांगितलं?
रुपर्ट लो म्हणाले, मी जे सांगतो आहे त्या सगळ्याच कहाण्या भयंकर आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. एका मुलीने तिच्या जबाबात सांगितलं की तिच्यावर कदाचित ६०० हून अधिक लोकांनी बलात्कार केला. एका दुसऱ्या पीडितेने सांगितलं की मी १२ किंवा १३ वर्षांची होते. तेव्हा माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये एका आरोपीने दारुची बाटली घालत बळजबरी केली. त्याच्याशी झटापट करताना बाटलीची काच आतच तुटली आणि मला जखमा झाल्या. एका पीडितेने सांगितलं की तिच्या चेहऱ्यावर आरोपीने जळती सिगारेट विझवली होती. तिला चटकेही दिले होते. आणखी एका पीडितेने सांगितलं की माझ्यासह ज्या मुलींचं शोषण झालं त्या ब्रिटिश मुलीच होत्या. तसंच मी एकदा १५ ते २० मुलींना एका व्हॅनमध्ये कुत्र्यांसारखं कोंडून ठेवल्याचंही पाहिलं.
एका पीडितेने सांगितलं की पोलिसांनी तिच्यावर बलात्कार केला-रुपर्ट लो
रुपर्ट लॉ पुढे म्हणाले की या सगळ्या अत्याचारांमध्ये वर्णभेदाचे प्रकारही समोर आले कारण आरोपींनी ब्रिटिश मुलींनाच लक्ष्य केलं. १२ ते १६ वर्षे वयोगटातील मुलींवर अत्याचार केले. एका ख्रिश्चन पीडितेने सांगितलं की ती गळ्यात क्रॉसच लॉकेट घालायची म्हणून आरोपीने तिची खिल्ली उडवली होती. कुठे आहे तुझा देव? त्याने तुला माझ्यासाठी सोडून दिलंय ना? असं तो म्हणाला होता. यानंतर रुपर्ट लॉ म्हणाले की एका पीडितेने असंही सांगितलं की आहे की देशातल्या काही काही भागांमध्ये असे पोलीस अधिकारीही आहेत ज्यांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. रुपर्ट लॉ यांनी त्यांच्या भाषणात हादरवून टाकणारे आणि तेवढीच चिड आणणारे हे खुलासे केले आहेत. एनडीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
माझी अवस्था खूप भयंकर झाली होती, रुग्णालयात गेले पण काय झालं ते सांगू शकले नाही
एका पीडितेने असं सांगितलं की माझ्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत होतं. तो भाग सुजला होता. मला नीट बसताही येत नव्हतं. मी कशीतरी रुग्णालयात गेले, मी त्यांना खरं काही सांगायची हिंमत करु शकले नाही. त्यांनी माझी परिस्थिती पाहिली आणि काही प्रश्न विचारले नाहीत. मला गोळ्या दिल्या आणि रुग्णालयातून घरी पाठवलं. मी तेव्हा १५ वर्षांची होते. आणखी एका पीडितेने सांगितलं की मला काही लोकांनी पकडून नेलं. माझ्या भोवती काही माणसं जमा झाली. ते मला घाबरवत वगैरे नव्हते. पण माझं शुटिंगकरत होते, तिथे एका कुत्र्याला आणलं गेलं. मग या जमलेल्या लोकांमध्ये पैज लागली की कुत्रा माझ्यावर बलात्कार करेल की नाही करणार? त्यानंतर काही वेळाने कुत्र्याने माझ्यावर बलात्कार केला. त्यावेळी हे सगळे लोक हसत होते. आणखी एका मुलीने सांगितलं की काही लोक माझ्याभोवती जमले, त्याननंतर त्यांनी मला मारहाण केली. माझ्यावर वारंवार बलात्कार केला. तसंच सामूहिक बलात्कारानंतर मला पुन्हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. कुणाला काही सांगितलंस तर तुला तर मारुन टाकूच पण तुझ्या कुटुंबालाही ठार करु अशी धमकी मला त्यांनी दिली असंही या पीडितेने सांगितलं.
रुपर्ट लो यांनी आरोपींबाबत काय सांगितलं?
रुपर्ट लो यांनी आरोपींबाबत सांगितलं की यातले बहुतांश जण हे टॅक्सी ड्रायव्हर आहेत किंवा पाकिस्तानी वंशाचे व्यावसायिक आहेत. त्यांनी ब्रिटिश मुलींना टार्गेट केलं आणि त्यांचं शोषण केलं.
ग्रूमिंग गँग्स प्रकरण आहे काय?
ब्रिटनच्या इतिहासाला काळीमा फासणारं आणि सर्वात दीर्घ काळ चाललेलं हे ग्रुमिंग गँग्स स्कँडल आहे. मागील २० वर्षांमध्ये ब्रिटनमधल्या अनेक शहरांमध्ये अशा टोळ्यांचा पर्दाफाश झाला आहे जे अल्पवयीन मुलींना फूस लावतात, आमीष दाखवतात आणि मग त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात, बलात्कार करतात. २००२ मध्ये पहिल्यांदा या स्कँडलचे संकेत मिळाले होते. २०१० मधअये राष्ट्रीय स्तरावर या प्रकरणी आवाज उठवण्यात आला कारण साउथ यॉर्कशायरच्या रॉदरहॅम या ठिकाणी १२ ते १६ वर्षीय मुलींच्या लैंगिक शोषणासाठी पाच जणांना शिक्षा झाली. यानंतर ज्या बातम्या समोर आल्या त्यात हे कळलं की ब्रिटिश पाकिस्तानी वंश असलेल्या पुरुषांकडून ब्रिटिश मुलींवर अत्याचार केले जात आहेत. रॉदरहॅमसह रोशडेल, ओल्डहॅम आणि टेलफोर्ड या शहरांमध्येही ग्रुमिंग गँग्स तयार झाल्या आहेत. स्थानिक पोलीस, सामाजिक संस्था, मानवी हक्क आयोग, पीडिता आणि त्यांच्या कुटुंबांकडून जो आवाज उठवण्यात आला त्याकडे या टोळ्यांनी दुर्लक्ष केलं आणि अल्पवयीन मुलींना फुस लावून त्यांचं शोषण सुरु ठेवलं. या प्रकरणाची दाहकता किती आहे ते आज रुपर्ट लो यांनी संसदेत वाचून दाखवलं.
