खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत व कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहे. या प्रकरणात कॅनडानं भारतावर गंभीर आरोप केल्यानंतर याची सुरुवात झाली. दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली असून आपापल्या नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. याच वादादरम्यान कॅनेडियन गायक व रॅपर शुभनीत सिंगने एक पोस्ट केली होती. त्यानंतर त्याचा मुंबईती कॉन्सर्ट रद्द करण्यात आला होता.

Video: “कॅनडाच्या संसदेत भारतावर आरोप करण्याचा निर्णय…”, जस्टिन ट्रुडोंनी दिलं स्पष्टीकरण!

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

शुभनीतने इन्स्टाग्राम स्टोरीवर भारताचा नकाशा शेअर केला होता. ज्यामध्ये पंजाब, काश्मीर आणि ईशान्येकडील काही भाग गायब होते. हा नकाशा शेअर करत “पंजाबसाठी प्रार्थना करा” असं त्याने स्टोरीमध्ये लिहिलं होतं. ही पोस्ट व्हायरल होताच त्याला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. इतकंच नाही तर शुभनीतचा कॉन्सर्ट २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर होणार होता. पण त्याच्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे तो रद्द करण्यात आला. या संपूर्ण वादानंतर आता शुभनीतने एक पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

शुभनीतने लिहिलं, “भारतातील पंजाबमधील एक तरुण रॅपर-गायक म्हणून माझे संगीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणणे हे माझे आयुष्याचे स्वप्न होते. परंतु अलीकडील घडामोडींमुळे माझी मेहनत आणि प्रगती कमी झाली आहे. मला माझी निराशा आणि दु:ख व्यक्त करण्यासाठी काही शब्द बोलायचे होते. भारतातील माझा दौरा रद्द झाल्याने मी अत्यंत निराश झालो आहे. माझ्या देशात, माझ्या लोकांसमोर परफॉर्म करण्यासाठी मी खूप उत्साही होतो. तयारी जोरात सुरू होती आणि मी मागच्या दोन महिन्यांपासून मनापासून सराव करत होतो. मी खूप उत्साही, आनंदी आणि परफॉर्म करण्यास तयार होतो. पण मला वाटतं की नियतीच्या मनात वेगळ्याच योजना होत्या.”

Indians in Canada: भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा थांबवली; हरदीप निज्जर हत्या प्रकरणातील आरोपांनंतर मोठा निर्णय!

पुढे त्याने लिहिलं, “भारत माझाही देश आहे. माझा जन्म इथेच झाला आहे. ही माझ्या गुरूंची आणि माझ्या पूर्वजांची भूमी आहे, ज्यांनी या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी, तिच्या वैभवासाठी बलिदान दिले. पंजाब माझा आत्मा आहे, पंजाब माझ्या रक्तात आहे. मी आज जो काही आहे तो पंजाबी असल्यामुळे आहे. पंजाबींना देशभक्तीचा दाखला देण्याची गरज नाही. इतिहासाच्या प्रत्येक वळणावर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पंजाबींनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. म्हणूनच माझी नम्र विनंती आहे की प्रत्येक पंजाबीला फुटीरतावादी किंवा देशद्रोही म्हणणं टाळावं.”

“माझ्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ती पोस्ट पुन्हा शेअर करण्याचा माझा हेतू फक्त पंजाबसाठी प्रार्थना करण्याचा होता, कारण संपूर्ण राज्यात वीज आणि इंटरनेट बंद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामागे दुसरा कोणताही विचार नव्हता आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नक्कीच नव्हता. होणाऱ्या आरोपांचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. पण माझ्या गुरूंनी मला सर्व मानव एकच आहेत असं शिकवलं. तसेच न घाबरणं हेच पंजाबियतचे मूळ आहे अशी शिकवणही दिली. मी कठोर परिश्रम करत राहीन. मी आणि माझी टीम लवकरच परत येऊ, खंबीर राहू आणि एकत्र येऊ”, असं म्हणत शुभनीतने पोस्टचा समारोप केला.

Story img Loader