scorecardresearch

Premium

VIDEO : राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची हत्या, चार हल्लेखोरांनी घरात घुसून झाडल्या गोळ्या, परिसरात एकच खळबळ

Karni Sena Chief Sukhdev Singh Gogamedi Shot Dead : चार हल्लेखोरांनी करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

Karni Sena chief Sukhdev Singh Gogamedi shot dead News in Marathi
सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या (Facebook/Bhanwar Singh Palara/PTI)

Karni Sena Latest News : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या घटनेमुळे जयपूर हादरलं आहे. हत्येची बातमी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली आहे. हल्लेखोरांनी गोगामेडींवर एकूण चार गोळ्या झाडल्या.

पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, गोळीबाराचा आवाज ऐकून गोगामेडी यांच्या शेजारी राहणाऱ्या इतर लोकांनी गोगामेडींच्या घराकडे धाव घेतली. हल्ला झाला तेव्हा गोगामेडी यांच्याबरोबर घरात उपस्थित असलेले अजित सिंह हेदेखील या हल्ल्यावेळी गोळी लागून गंभीर जखमी झाले आहेत.

Due to security reasons Ganpat Gaikwad in court in the morning with police force
सुरक्षेच्या कारणास्तव गणपत गायकवाड सकाळीच पोलिसांच्या फौजफाट्यासह न्यायालयात
Home Minister Devendra Fadnavis marathi news, three murders nagpur marathi news, nagpur crime news
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात चोवीस तासांत तीन हत्याकांड; अखेर ‘त्या’ जखमीचाही मृत्यू
Ajit Pawar Supriya Sule
“इथून पुढे माझ्या विचारांचा खासदार…”, अजित पवारांनी बारामतीत रणशिंग फुंकलं; म्हणाले, “इतके दिवस…”
Sushma Andhare on Ganpat Gaiwad shooting
“शिंदे आणि फडणवीस यांच्यात…”, सुषमा अंधारेंची जोरदार टीका; म्हणाल्या, “गँगवॉर…”

या हत्याप्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सुखदेव सिंह गोगामेडी मंगळवारी दुपारच्या वेळी त्यांच्या घरीच होते. दुपारी १.४५ वाजता चार हल्लेखोर मोटरसायकलवरून त्यांच्या घरी आले. त्यांनी घरात घुसून गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला. या हल्यात त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्याबरोबर असलेले अजित सिंह गंभीर जखमी झाले आहेत. श्यामनगर पोलीस या हत्याप्रकरणाचा तपास करत आहेत.

एक हल्लेखोर पोलीस चकमकीत ठार

या हत्या प्रकरणावर बोलताना जयपूर पोलीस आयुक्त बी. जी. जॉर्ज जोसेफ म्हणाले, हल्लेखोर कोण होते याची माहिती मिळाली आहे. हल्लेखोरांपैकी एक जण चकमकीत ठार झाला आहे. नवीन सिंह शेखावत असं त्याचं नाव असून तो जयपूरच्या शाहपुरा येथील रहिवासी होता. शाहपुरात त्याचं एक छोटं दुकान आहे. इतर दोन हल्लेखोर रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीची स्कूटर घेऊन पळून गेले.

हे ही वाचा >> कोण होते सुखदेव सिंह गोगामेडी? ‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध केल्यामुळे चर्चेत आले होते राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष

हल्लेखोरांनी सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या घराबाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकाशी बातचीत केली. गोगामेडी घरात असल्याची माहिती घेतली आणि मग ते घरात घुसले. आत जाऊन ते गोगामेडी यांच्याशी बोलत होते. बातचीत सुरू असतानाच हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rashtriya rajput karni sena president sukhdev singh gogamedi shot dead in jaipur asc

First published on: 05-12-2023 at 16:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×