उद्योगपती रतन टाटा यांचा पीएम केअर फंडाच्या विश्वस्तांमध्ये समावेश करण्यात आला आहे. रतन टाटा यांच्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती के टी थॉमस, माजी उपसभापती करिया मुंडा यांच्यासह नामांकित व्यक्तींचीही विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>> इंग्लंडमधल्या हिंदू मंदिराबाहेर २०० मुस्लिमांचा जमाव; अल्लाहू अकबरचे नारे

या नियुक्त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध करत सर्व नवनियुक्त विश्वस्तांचे स्वागत केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील पीएम केअर फंडाचे विश्वस्त आहेत.

हेही वाचा >>>>“पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी योग्य बोलले”, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक मंचावर जाहीरपणे मांडली भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल (२० सप्टेंबर) पीएम केअर फंडच्या विश्वस्तांची एक बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये पीएम केअर फंडच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीला रतन टाटादेखील उपस्थित होते. त्यानंतर आज त्यांचा पीएम केअर फंडच्या विश्वस्तांमध्ये समावेश केला आहे.