Ratan Tata Pet Dog Video: उद्योगपती रतन टाटा यांनी ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश हळहळत आहे. रतन टाटा यांच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी कुटुंबाबरोबर आले होते. रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या लोकांचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. यापैकीच एका व्हिडीओने लक्ष वेधून घेतले.
रतन टाटा प्राणीप्रेमी होते, त्यांना श्वान खूप आवडायचे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या पाळीव श्वानाला अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलं, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. त्या श्वानाने सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. व्हिडीओत त्या श्वानाला घेऊन येणारी तरुणी माध्यमांना त्या श्वानाला जाऊ देण्याची विनंती करताना दिसते. “त्याला जाऊद्या, त्याने सकाळपासून काहीच खाल्लं-प्यायलं नाहीये, प्लीज त्याला जाऊद्या”, असं ती म्हणते.
हेही वाचा – कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची रतन टाटांशी भेट अन् मैत्री कशी झाली? वाचा
हा व्हिडीओ पाहून नेटकरी हळहळले आहेत. श्वानाला दिवंगत रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या टीमने आणलं. हे पाहून माझा जीव तुटतोय, हे आहे खरं प्रेम, हा व्हिडीओ खूप भावनिक आहे, अशा कमेंट्स यावर नेटकरी करत आहेत. वरिंदर चावला या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा – रतन टाटा यांच्या निधनानंतर सिमी गरेवाल यांची भावनिक पोस्ट; म्हणाल्या, “तुमचं जाणं सहन करणं…”
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – ‘या’ एकमेव अभिनेत्याने पडद्यावर साकारली रतन टाटांची भूमिका, तुम्ही पाहिलाय का हा सिनेमा?
रतन टाटा यांचं मुक्या प्राण्यांवर खूप प्रेम होतं. त्यांची आणि शांतनू नायडूची मैत्री होण्यामागे श्वानांवरच प्रेम हे एक मुख्य कारण होतं. शांतनूने मुक्या श्वानांचा जीव वाचवणारं एक डिव्हाइस तयार केलं होतं, ज्याची प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर रतन टाटा शांतनूला मुंबई ऑफिसमध्ये भेटले होते आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं होतं. त्यांनी शांतनूला मोठ्या प्रमाणात या डिव्हाइसची निर्मिती करण्यासाठी आर्थिक मदतही केली होती.