दिग्दर्शक रवी जाधव यांना पितृशोक

त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्यांनी या पोस्टद्वारे त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. रवी जाधव यांचे वडिल हरिश्चंद्र भिकाजी जाधव यांचे ९ जानेवारी २०२१मध्ये अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे.

रवी जाधवने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा फोटो शेअर केला आहे. ‘आमचे वडील श्री. हरिश्चंद्र भिकाजी जाधव यांचे शनिवार दिनांक ९ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या डोंबिवली येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. या कठीण काळात आम्हा जाधव कुटुंबीयांना आधार देणाऱ्या आमच्या सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, हितचिंतक आणि कासे ग्रामस्तांचे शतश: आभार’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे त्यांनी म्हटले, ‘आमचे पप्पा नेहमीच निर्धास्तपणे हसत खेळत रहायचे. आजही ते कासे गावातील श्री देव गजाननाच्या देवळाजवळ एखादे सुंदर फुलपाखरु होऊन छान बागडत असतील.’ रवी जाधव यांच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ravi jadhav writes a eulogy for his late father announcing his sad demise avb

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या