राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेत मोदी सरकावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांवरून पुन्हा एकदा हल्लाबोल केला. तसेच भाजपाकडून सातत्याने लोकशाहीवर हल्ला केला जात असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, राहुल गांधींच्या या टीकेला भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “राहुल गांधींना लालू प्रसाद यादवांचा शाप लागला”, भाजपा नेत्याचं अजब विधान

काय म्हणाले रविशंकर प्रसाद?

राहुल गांधी यांनी सवयीप्रमाणे मुद्द्यावरून भरकटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही चुकीची विधानं केली. राहुल गांधी यांनी २०१९ मधील एका भाषणात सर्व मोदी चोर आहेत, असं म्हटलं होतं. तसेच आज बोलताना त्यांनी मी विचारपूर्वक बोलते, असं सांगितलं. म्हणजेच २०१९ मध्ये त्यांनी विचारपूर्वकच मोदींना चोर म्हटलं. त्यांनी ओबीसींचा अपमान केला, असं प्रत्युत्तर भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी दिली. तसेच राहुल गांधी यांना टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र कोणाला शिविगाळ करण्याचा अधिकार नाही. पण त्यांनी भर सभेत मोदींना शिविगाळ केली होती, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – VIDEO : “माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे; मी माफी मागणार नाही”, राहुल गांधींचं भाजपाला प्रत्युत्तर

राहुल गांधी याचे स्वत:चे हात भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. त्यांच्या मनमोहनसिंग सरकारच्या काळात टुजी, कोळसा, आदर्शासारखे मोठे घोटाळे झाले. त्यांच्या संपूर्ण मंत्रीमंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. खरं तर स्वत: राहुल गांधींवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते जामीनावर आहेत. अशात ते इमानदारीने काम करणाऱ्या मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, हे दुर्देवी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – VIDEO : “क्यू हवा निकल गई क्या?”, भर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी टोचले पत्रकाराचे कान

दरम्यान, अदाणी आणि मोदींच्या संबंधांवर प्रश्न विचारल्यानेच माझ्याविरोधात कारवाई करण्यात आली, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यालाही रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये मोदी समाजाविरोधात व्यक्तव्य केलं होतं. त्यानंतर मोदी समाजाच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली. याप्रकरणात न्यायालयाने त्यांना माफी मागण्यास सांगितले. मात्र, त्यांनी माफी न मागितल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. खरं तर त्यांच्या विरोधात अशाप्रकारे सात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी अदाणींच्या मुद्द्यावरून केलेले आरोप खोटे आहेत. त्याच्या या कारवाईशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shankar prasad replied to rahul gandhi after allegation on pm modi spb
First published on: 25-03-2023 at 19:47 IST