scorecardresearch

Premium

ईदच्या मिरवणुकीत झालेल्या आत्मघातकी स्फोटामागे ‘रॉ’चा हात? पाकिस्तानचे भारतावर गंभीर आरोप

पाकिस्तानमध्ये शुक्रवारी प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीदिवशी दोन आत्मघातकी स्फोट घडले. यामध्ये एकूण ६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Explosion in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी स्फोट (फोटो – Reuters)

पाकिस्तानमध्ये शुक्रवारी (२९ सप्टेंबर) प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीदिवशी दोन आत्मघातकी स्फोट घडले. या दोन्ही स्फोटात एकूण ६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन स्फोटानंतर शनिवारी पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले. संबंधित आत्मघातकी स्फोटामागे भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’चा (RAW) हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला. या आरोपानंतर भारत-पाकिस्तान संबंध आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील मदिना मशिदीजवळ ईदच्या मिरवणुकीत आत्मघातकी स्फोट झाला. या भीषण स्फोटात सुमारे ६० जणांचा मृत्यू झाला तर ६० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या वाहनांजवळच हा स्फोट घडला, यामध्ये मालमत्तेचंही प्रचंड नुकसान झालं. या स्फोटानंतर अवघ्या काही तासांत खैबर पख्तूनख्वाच्या हंगू शहरातील एका मशिदीत आणखी एक स्फोट झाला. यामध्ये किमान ५ लोकांचा मृत्यू झाला. तर डझनभर लोक जखमी झाले.

earthquake in afghanistan
अफगाणिस्तानात तीव्र भूकंप; मृतांचा आकडा २०५३ वर, ९ हजाराहून अधिक जखमी
Narendra modi rushi sunak canada president trudo
भारत-कॅनडा तणाव दूर व्हावा; ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि टड्रो यांच्यात संवाद 
beggars in saudi arabia
पाकिस्तान भिकाऱ्यांची निर्यात करणारा देश कसा बनला? परदेशात ९० टक्के भिकारी पाकिस्तानचे
india rejects justin trudeau allegations
खलिस्तानवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येचे प्रकरण : ट्रुडोंचा पुराव्यांचा दावा भारताला अमान्य

या दोन आत्मघातकी स्फोटानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुगती यांनी भारतावर गंभीर आरोप केला. त्यांनी या आत्मघातकी स्फोटामागे भारताची गुप्तचर संस्था ‘रिसर्च अँड अॅनालिसिस विंग’ अर्थात ‘रॉ’चा हात असल्याचा दावा केला. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.

हेही वाचा- पाकिस्तानात ईदच्या मिरवणुकीत आत्मघातकी स्फोट; ५२ जणांचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहांचा खच, VIDEO आला समोर

“मस्तुंग येथील आत्मघातकी बॉम्बस्फोटात सामील असलेल्या घटकांना पाकिस्तानी लष्कर आणि इतर सर्व संस्थांकडून जशास तसं उत्तर दिलं जाईल. या हल्लात RAW सामील आहे,” असं पाकिस्तानचे गृहमंत्री म्हणाले. शनिवारी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही, अशी माहिती सीटीडीने दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raw behind suicide blast in eid procession balochistan 65 deaths pakistan serious accusations against india rmm

First published on: 01-10-2023 at 09:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×