Ray Ban च्या मालकांचं निधन; इटलीतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत होते दुसऱ्या स्थानी

लिओनार्डो डेल वेचिओ यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

Leonardo Del Vecchio
Leonardo Del Vecchio death

इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि गॉगल निर्मिती क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे लिओनार्डो डेल वेचिओ यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. डेल वेचिओ अनाथालयात वाढले. पैशांच्या चणचणीमुळे त्यांना किशोर वयापासूनच काम करावे लागले होते. मात्र पुढे त्यांनी आपले चातूर्य आणि कौशल्याच्या जोरावर इटलीमध्ये गॉगल निर्मिती क्षेत्रात स्वत:चे साम्राज्य निर्माण केले. गॉगल्समधील जगप्रसिद्ध ब्रँड रे बॅन हे त्यांच्याच मालकीचे आहे. ते इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.

हेही वाचा >>> धक्कादायक! अमेरिकेत ट्रकमध्ये आढळले ४० मृतदेह

डेल वेचिओ यांचा जन्म २२ मे १९३५ रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. आई-वडील नसल्यामुळे त्यांनी आपले बालपण अनाथालयात घालवले. तसेच किशोरवयातच त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. मात्र पुढे १९६१ साली त्यांनी Luxottica नावाची स्वत:ची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीला ते गॉगल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सुटे भाग विकायचे.

हेही वाचा >>> फॅक्ट चेकिंग वेबसाईटच्या सहसंस्थापकांना दिल्ली पोलिसांकडून अटक, थेट राहुल गांधींनी घेतली दखल, म्हणाले….

मात्र पुढे दशकभरानंतर त्यांनी Luxottica या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून स्वत: गॉगल्स निर्मिती करण्याचे ठरवले. सुरुवातीला त्यांच्या कंपनीचे उत्पादन फक्त इटलीपर्यंत सीमित होते. मात्र हळूहळू त्यांनी संपूर्ण युरोपातील बाजारपेठा काबीज केल्या. पुढे त्यांनी फॅशन डिझायनिंग ब्रँड अरमानीसह अनेकांशी भागिदारी केली. तसेच पुढे त्यांनी रे बॅन, पर्सोल, आणि ओक्ले अशा ब्रँड्सवर मालकी मिळवली. पुढे Luxottica या कंपनीने लेन्सक्राफ्ट, सनग्लास हट अशा कंपन्यांना खरेदी केले. परिणामी Luxottica कंपनीचा संपर्क थेट ग्राहकांशी होऊ लागला.

हेही वाचा >>>मोदी सरकारनेच काही मंत्री, पत्रकारांना ब्लॉक करण्याची केली होती विनंती; ट्विटरच्या कागदत्रांमधून खुलासा

दरम्यान, डेल वेचिओ यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून इटलीमधील उद्योग क्षेत्रातील बादशाह हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ray ban owner leonardo del vecchio passes away at age of 87 prd

Next Story
मोदी सरकारनेच काही मंत्री, पत्रकारांना ब्लॉक करण्याची केली होती विनंती; ट्विटरच्या कागदपत्रांमधून खुलासा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी