वृत्तसंस्था, मॉस्को : युक्रेन युद्धाशी संबंधित सर्व पक्षांशी वाटाघाटी करण्यास रशिया तयार आहे, मात्र युक्रेन आणि त्याच्या पाश्चात्त्य पाठीराख्यांनीच चर्चेस नकार दिला आहे, असा आरोप रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी प्रक्षेपित झालेल्या एका मुलाखतीत केला. आम्ही युद्धाबाबत स्वीकारार्ह उपायांवर चर्चा करण्यास तयार आहोत, परंतु ही बाब त्यांच्यावर (पाश्चात्त्य देश) अवलंबून आहे. कारण आम्ही वाटाघाटीस नकार देणारे नाही, तर नकार देणारे ‘ते’ आहेत, असे ‘रोसिया वन’ या सरकारी दूरचित्रवाहिनीला रविवारी दिलेल्या मुलाखतीत पुतिन म्हणाले.

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाशात्य देश रशियाला एकटा पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याने रशियाची युक्रेनमधील कारवाई योग्य दिशेने सुरू आहे, असेही पुतिन म्हणाले. आम्ही योग्य दिशेने जात आहोत, असा माझा ठाम विश्वास आहे. आम्ही आमच्या राष्ट्रहिताचे, आमच्या नागरिकांचे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करत आहोत, आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही, अशा शब्दांत त्यांनी युक्रेन युद्धाचे समर्थन केले.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
Supreme Court understanding of Ajit Pawar group regarding use of clock symbol
वृत्तपत्रात निवेदन ठसठशीत छापा! सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला समज

 पाश्चात्त्य देशांबरोबरचा ‘भू-राजकीय संघर्ष’ धोकादायक पातळीवर पोहोचला आहे का, असे विचारले असता पुतिन म्हणाले, ‘‘मला तो तितका धोकादायक आहे, असे वाटत नाही आणि २०१४मध्ये रशिया समर्थक अध्यक्षांचा पाडाव करून पाश्चात्त्यांनीच या संघर्षांला तोंड फोडले होते. वास्तविक, रशियाच्या भू-राजकीय विरोधकांच्या धोरणाचा हेतू रशियाला वेगळे पाडणे हा आहे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. रशियाचे ९९.०९ टक्के नागरिक मातृभूमीच्या हितासाठी सर्वस्व देण्यास तयार आहेत. त्यामुळे रशिया हा एक अद्वितीय देश आहे आणि आमच्याकडे असाधारण लोक आहेत, याची मला पुन्हा एकदा खात्री पटली. रशियाचा संपूर्ण इतिहासही हेच सांगतो, असे पुतिन म्हणाले.

‘ऐतिहासिक रशिया’

युक्रेनचे नागरिक आणि रशियाचे नागरिक हे एकच आहेत, या आपल्या युक्तिवादासाठी पुतिन यांनी मुलाखतीत ‘ऐतिहासिक रशिया’ असा शब्दप्रयोग केला. त्यामागे युक्रेनचे सार्वभौमत्व नाकारणे आणि युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचे समर्थन करणे हा हेतू असल्याचे स्पष्ट होते. ऐतिहासिक रशियाचे तुकडे पाडण्याचे आमच्या भू-राजकीय विरोधकांचे धोरण आहे. त्यांनी नेहमीच फूट पाडून जिंकण्याचा प्रयत्न केला. पण आमचे ध्येय सर्व रशियन नागरिकांना संघटित करणे हे आहे.

– व्लादिमीर पुतिन, अध्यक्ष, रशिया