भाजपाने राज्यापालांची भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे पोहोचले गुवाहाटीमधील कामाख्या देवीच्या मंदिरात

शिंदे यांना व्हाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आल्याने मंदिर परिसराला लष्करी छावणीचं स्वरुप आलं होतं.

भाजपाने राज्यापालांची भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे पोहोचले गुवाहाटीमधील कामाख्या देवीच्या मंदिरात
त्यांच्यासोबत चार बंडखोर आमदारही होते (फोटो एएनआयवरुन साभार)

एकनाथ शिंदे आणि गटाने महाविकास आघाडीला आमचा पाठिंबा नसल्याचं जाहीर केल्यानंतर भाजपाने मंगळवारी रात्री राज्यपालांकडे ठाकरे सरकारने बहुमत सादर करावे या मागणीसाठी पत्र दिलं. एकीकडे मुंबईमधील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच दुसरीकडे गुवाहाटीमध्ये वास्तव्यास असलेल्या बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणारे नेते एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. शिंदे यांच्या या देवदर्शनाचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्विटरवरुन शेअर केले आहेत.

नक्की वाचा >> फडणवीस-राज्यपाल भेटीनंतर शिंदेंनी रात्रीच घेतली तातडीची बैठक; मात्र बंडखोरांची ‘मुंबईवापसी’ शिवसेनेच्या ‘त्या’ निर्णयावर अवलंबून

मुंबईमध्ये मंगळवारी रात्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर शिंदे यांनी गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू या हॉटेलमधील बंडखोर आमदारांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पुढील निर्णय आणि वाटचालीसंदर्भात शिंदे यांनी सहकारी आमदारांशी चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. रात्री घेतलेल्या या बैठकीनंतर आज सकाळी आठच्या सुमारास एकनाथ शिंदे हे गुवाहाटीमधील कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचले.

नक्की वाचा >> “फडणवीस मुख्यमंत्रीपदाची आस धरून बसले असतील तर…”, शिवसेनेचा थेट इशारा; राष्ट्रवादीविरोधावरुन बंडखोरांवरही टीका

एकनाथ शिंदे यांना व्हाय दर्जाची सुरक्षा केंद्राकडून पुरवण्यात आल्याने ते या मंदिरात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला. मंदिर परिसराला काहीकाळ लष्करी छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. एकनाथ शिंदे यांचे मंदिरमध्ये देवीचं दर्शन घेतानाचे फोटो एएनआयने शेअर केले आहेत. यावेळेस शिंदेंसोबत देवदर्शनासाठी बंडखोर आमदारांमधील चार आमदार सोबत होते.

नक्की वाचा >> ‘काय झाडी… काय डोंगार… काय हाटील…’ने सोडवली पुणेकरांची मोठी समस्या; ही शक्कल पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय आयडीया…’

नक्की वाचा >> “एका बाजूला आपल्या पुत्राने…” मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवहानानंतर आदित्य, राऊतांच्या वादग्रस्त विधानांवरुन शिंदेंचा सवाल

दरम्यान, फडणवीस हे मंगळवारी दिल्लीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन रात्री मुंबईत परतले. त्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ‘‘शिवसेनेच्या ३९ आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. याशिवाय काही अपक्षांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. ४६ आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे,’’ अशी मागणी भाजपाने केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गट आज म्हणजेच २९ जून रोजी दुपारनंतर मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यपालांच्या पत्राची प्रत मिळाल्यानंतर शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार की नाही यावर हा निर्णय अवलंबून राहणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
उदयपूर हत्या प्रकरणावर राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले ‘धर्माच्या नावावर…’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी