Delhi Blast Update : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर झालेल्या स्फोटानंतर राष्ट्रीय राजधानीत खबरदारी घेतली जात आहे. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी शगरातील सर्व पोलीस ठाणी आणि चौक्यांवर एका लाल रंगाच्या फोर्ड इकोस्पोर्ट कारचा शोध आणि तपासणीसीठी निर्देश जारी केले आहेत. या कारचा दिल्ली पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.
लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली होती, ज्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात समोर आले आहे की दिल्ली स्फोटातील सहभागी संशयीताकडे ह्युंदाई i20 बरोबरच आणखी एक कार होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांची ५ पथके या कारचा शोध घेत आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथील पोलिसांना देखील या लाल कारबद्दल सतर्क करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भूतानहून परतल्यानंतर लगेचच लोक नायक जय प्रकाश नारायण रुग्णालयात जाऊन स्फोटातील जखमींची भेट घेतली. त्यानंतर ही घडामोड समोर आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांनी आतापर्यंत १००० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज क्लिप्स तपासल्या आहेत. तसेच तपास यंत्रणांना संशय आहे की दिल्लीतील हा कार स्फोट जास्तीत जास्त नुकसान पोहतवण्याच्या उद्देशाने केलेला आत्मघाती हल्ला असू शकतो.
तपास यंत्रण या सोशल मीडिया अॅक्टिव्हीटी मॉनिटर करत आहेत आणि दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणांचा मोबाईल फोन डम्प डेटा गोळा करत आहेत, असे वृत्त आयएएनएसने दिले आहे.
दरम्यान दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि मुंबई या ठिकाणी हाय अलर्ट देण्यात आला आहे. येथे गर्दीची ठिकाणे आणि धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
